Alia Bhatt wants More Babies : बॉलिवूड चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘जिगरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या निमित्ताने आलिया वेगवेगळ्या मुलाखती देताना दिसत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाकःतीत तिने तिच्या भविष्यातील योजनांचा खुलासा केला आहे. तिच्या या फ्युचर प्लॅनिंगमध्ये अधिक चित्रपट बनवणे, आणखी मुलं जन्म घालणे आणि अनेक ठिकाणी प्रवास करणे या गोष्टी सामील आहेत. आलियाला राहा नावाची मुलगी आहे. मात्र, भविष्यात तिला राहासाठी आणखी भावंडं हवी आहेत. याचा खुलासा तिने स्वतः केला. मात्र, याविषयावर अधिक बोलणं तिने टाळालं.
आपल्या भविष्यातील योजनांबद्दल बोलताना आलिया म्हणाली की, ‘मला फक्त अभिनेत्री म्हणून नव्हे, तर निर्माती म्हणून आणखी चित्रपट करण्याची इच्छा आहे. मला भविष्यात आणखी मुलं हवी आहेत. याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करायचा आहे. निरोगी, आनंदी, साधं, शांत आणि निसर्गाने रममाण होणारं आयुष्य जगायचं आहे.’ अभिनेत्री आलिया भट्टने एप्रिल २०२२मध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न केले. या जोडप्याने नोव्हेंबर २०२२मध्ये मुलगी राहाचे स्वागत केले.
नुकतीच आलिया भट्ट आयएमडीबीच्या ‘आयकॉन्स ओन्ली सेगमेंट’मध्ये सहभागी झाली होती. या दरम्यान, आलियाने तिच्या मुलीने मोठी झाल्यावर तिचे आणि तिचा पती रणबीरचे कोणते चित्रपट पाहावेत, यावर देखील भाष्य केलं. आलिया म्हणाली की, ‘मला वाटतं की 'स्टुडंट ऑफ द इयर' माझ्यामते अधिक चांगला असेल. प्रामाणिकपणे सांगू तर, हा सर्वात छान आणि साधा चित्रपट आहे, जो लहान मुले देखील पाहू शकतात. हा माझा पहिला चित्रपट आहे. मला त्या चित्रपटातील माझ्या अभिनयाचा फारसा अभिमान नसला तरी, या चित्रपटात भरपूर गाणी आहेत. आणि मला वाटते की, माझ्या मुलीला हा चित्रपट खरोखर आवडेल. आलियाने राहासाठी रणबीर कपूरचा 'बर्फी' हा चित्रपट निवडला. ती म्हणाली की, ‘मला वाटते की, हा मुलांसाठी खूप अनुकूल चित्रपट आहे.’
आलिया म्हणाली, ‘मला वाटते की, माझ्या कारकिर्दीत एक असा चित्रपट आहे, जो केल्याने मला माझ्या व्यक्तिमत्त्वात मोठा बदल जाणवला तो म्हणजे 'हायवे'. कदाचित मी इतके दिवस घरापासून दूर रस्त्यावर शूटिंग करत असल्याने हे सगळं वेगळं अनुभवायला मिळालं. कॉलेजमध्ये जाण्याचा अनुभव मी पहिल्यांदाच घेतला होता, पण माझे कॉलेज म्हणजे चित्रपटाचा सेट होता.’
आलिया पुढे म्हणाली की, ‘त्यानंतर, 'उडता पंजाब' हा एक चित्रपट होता, ज्यात माझ्या पात्राने मला खूप अस्वस्थ केले. पण मला वाटतं हा पहिला आणि एकमेव चित्रपट आहे, ज्यात मी पूर्ण पद्धतशीर अभिनय केला आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी मी शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या जगापासून अलिप्त झाले होते. तर, ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या अनुभवाने मी स्वतः खूप प्रभावित झाले.’