बॉलिवूड कलाकारांच्या पाठीमागे सतत फोटोग्राफर फिरताना दिसतात. मग ते जीम बाहेर असोत, घरा बाहेर असोत किंवा विमानतळावर असोत सगळीकडे फोटोग्राफर त्यांच्या पाठीमागे फिरतच असतात. कधीकधी फोटोग्राफर्स आणि कलाकारांमधील संवाद देखील व्हायरल होताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री आलिया भट्टचा एक व्हिडीओ व्हायरल होता आहे. या व्हिडीओमध्ये फोटोग्राफर्सने आलियाला मराठीत आवाज दिला आहे.
आलिया ही गुरुवारी लंडनमध्ये दिसली. त्यापूर्वी ती मुंबई विमानतळावर दिसली होती. ती चॅरिटी गाला होस्ट करण्यासाठी पोहोचली होती. त्यापूर्वी मुंबई विमानतळावर आलियाचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्स देखील पोहोचले होते. आलिया गाडीतून उतरते आणि चालत असते. एक चाहती आलियासोबत फोटो काढते. त्यानंतर फोटोग्राफर्सच्या गर्दीतून कोणीतरी आलियाला 'वहिनी नमस्कार' असा आवाज देतं. आलिया ते ऐकून लाजते आणि हसत तेथून निघून जाते.
वाचा: परिणिती चोप्रा देणार चाहत्यांना गुडन्यूज? सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण
सोशल मीडियावर आलियाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आलियाचे कौतुक केले आहे. अनेकांनी या व्हिडीओवर रेड हार्ट इमोजी वापरुन कमेंट केल्या आहेत. सध्या सर्वत्र आलियाच्या या व्हिडीओची चर्चा पाहायला मिळत आहे.
वाचा: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सहभागी व्हायचे? मग ही बातमी नक्की वाचा
लंडनमधील मँडारिन ओरिएंटल हाइड पार्क इथे होप गाला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलिया करताना दिसली. तसेच या कार्यक्रमात हर्षदीप कौर, कॉमेडियन रोहन जोशी आणि कोरिओग्राफर उषा जे यांनी परफॉर्मन्स दिला होता. सलाम बॉम्बे या संस्थेला मदत करण्यासाठी होप गाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
आलियाचा 'जिगरा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच आलियाने या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वेदांग रैना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी तिचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आलियासोबत रणवीर सिंग दिसला होता.