Alia Bhatt Neetu Kapoor Viral Video: सोशल मीडिया आणि बॉलिवूड सेलिब्रिटी यांचं नातं अगदी चहा आणि बिस्किटासारखं आहे. सेलिब्रिटींच्या फोटो , व्हिडीओ आणि बातम्यांशिवाय सोशल मीडिया अपूर्णच आहे. नुकताच सोशल मीडियावर आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांच्यातील नातं आणि या सासू सुनेचं प्रेम पाहून आता त्यांचे चाहते कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सुट्टीच्या दिवशी आपल्या कुटुंबासोबत जेवणासाठी बाहेर गेली होती. यावेळी आलियासोबत तिची बहीण शाहीन भट्ट, आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर या देखील दिसल्या. आलियाच्या या गर्ल गँगने एकत्र धमाल केली. जेवण करून रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना पापाराझींनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. यावेळी आलियाने एक-एक करून सगळ्यांना कारमध्ये बसवले. यावेळी नीतू कपूर यांनी ज्या पद्धतीने सून आलियावर प्रेमाचा वर्षाव केला, त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये सासू-सूनेमधील प्रेमळ बॉन्डिंग स्पष्टपणे दिसली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या लंच पार्टीसाठी आलियाने हिरव्या आणि करड्या रंगाची सँडो आणि शर्ट घातला आहे. यासोबत तिने डेनिम जीन्स घातली आहे. तर, नीतू कपूर यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम परिधान केली आहे. जेवून बाहेर पडत असताना नीतू गाडीच्या दिशेने जात असताना त्यांनी आलियाला मिठी मारली आणि सुनेच्या गालावर प्रेमाने कीस केले. नंतर आलिया भट्ट हिने तिची आई सोनी राजदान आणि बहिणीला कारमध्ये बसवले आणि त्यांचा निरोप घेतला. यावेळी तिथे झालेल्या गर्दीमुळे एका फोटोग्राफरचा तोल गेला. यावेळी आलिया त्याला 'अरे, टेक इट इझी' असे म्हणाली. तर, कारमध्ये बसण्यापूर्वी तिने अनेक चाहत्यांसोबत फोटोही काढले.
आलिया भट्ट ही सध्या तिच्या लेकीच्या संगोपनात व्यस्त झाली आहे. १४ एप्रिल २०२२ रोजी आलिया भट्ट हिने रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली होती. तर, जून २०२२मध्ये तिने चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आलिया भट्टने मुलगी राहा कपूर हिला जन्म दिला होता. आता रणबीर आलियाची लेक एक वर्षांची झाली आहे. तर, आलिया देखील तिच्या देखभालीत व्यस्त आहे.