देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑक्टोबर रोजी एनएसएसीसीला हजेरी लावली. त्यांच्या हस्ते एनएमएसीसीच्या १४१व्या आयओसी सत्राचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला राजकीय मंडळींसोबतच काही कलाकार मंडळी देखील उपस्थित होती. या उद्घाटन सोहळ्याला नरेंद्र मोदी यांनी भाषण दिले. सध्या सोशल मीडियावर या सोहळ्यातील फोटो व्हायरल झाले आहेत. दरम्यान, आलिया भट्टच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
एनएमएसीसीच्या १४१व्या आयओसी सत्राच्या उद्घाटन सोहळ्याला शाहरुख खान, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर आणि आलियी भट्ट हे कलाकार उपस्थित होते. दीपिका आणि शाहरुख शेजरीशेजारी बसले होते. त्यांच्या मागच्या रांगेत आलिया आणि रणबीर बसले होते. सध्या सोशल मीडियावर या सोहळ्यातील एक फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोमध्ये आलिया चक्क झोपलेली दिसत आहे.
वाचा: ‘बिग बॉस १७’मध्ये सहभागी होणाऱ्या कपल्ससाठी खास जागा; २४ तास राहणार प्रेक्षकांची नजर!
धक्कादायक प्रकार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असतानाच आलिया भट्ट ही थेट झोप काढताना दिसत आहे. यामुळे हा फोटो पाहून सर्वजण हैराण झाले. तर दुसरीकडे दीपिकरा पादूकोण ही मोदींकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. नेटकऱ्यांनी हे फोटो पाहून आलिया आणि दीपिका दोघींनाही सुनावले आहे. एका यूजरने कमेंट करत, 'हे बघा आपले बॉलिवूड स्टार.' तर दुसऱ्या एका यूजरने 'रणबीर कपूर याला आता पश्चाताप होत असणार आलियासोबत लग्न केले म्हणून' असे म्हटले आहे. अनेकांनी आलिया आणि दीपिकाला खडेबोल सुनावले आहेत.