आलियाच्या बॉडीगार्डचं गैरवर्तन, सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला...; व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आलियाच्या बॉडीगार्डचं गैरवर्तन, सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला...; व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले!

आलियाच्या बॉडीगार्डचं गैरवर्तन, सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला...; व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले!

Nov 09, 2024 01:04 PM IST

Alia Bhatt bodyguards Video: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या बॉडीगार्डने चाहत्याशी केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओ: आलियाच्या बॉडीगार्डचं गैरवर्तन
व्हायरल व्हिडिओ: आलियाच्या बॉडीगार्डचं गैरवर्तन

Alia Bhatt News: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. आलियाने अतिशय कमी वेळात इंडस्ट्रीत आपले खास स्थान निर्माण केले आहे. आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे देणाऱ्या आलियाची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. अशातच आलियाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेत असतो. या व्हिडिओमध्ये आलियाच्या बॉडीगार्डने एका चाहत्यासोबत केलेले कृत्य पाहून नेटकरी प्रचंड संतापले आहेत. पण त्यानंतर आलियाने जे केले, त्याचे कौतुक केले जात आहे.

आलिया भट्ट नुकतीच विमानतळावर दिसली. यावेळी अभिनेत्रीसोबत तिचा बॉडीगार्डही उपस्थित होता. नेहमीप्रमाणे आलियाला पाहून तिच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आलियाला पाहताच चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी काढायला धडपड सुरू केली. अशातच आलियाच्या जवळ आलेल्या एका चाहत्याला तिच्या बॉडीगार्डने शर्ट पकडून पुढे ओढले. मात्र, हे पाहून आलिया संतापली. तिने आपल्या चाहत्याला तसे करण्यास स्पष्ट नकार दिला.

आलिया म्हणाली की, ‘असे कुणाशीही करू नका, कुणालाही हात लावू नका.’ आलियाला तिच्या बॉडीगार्डची ही कृती अजिबात आवडली नाही. यानंतर आलियाने स्वत: चाहत्याला आपल्याकडे बोलावून त्याच्यासोबत फोटो घेतला. आलियाचे हे वागणे पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत.

नुकताच आलिया आणि रणबीर कपूरने त्यांची मुलगी राहाचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्यांनी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते, ज्यात राहाचे आजी-आजोबा सोनी राजदान आणि महेश भट्ट, त्याची मावशी, आजी नीतू कपूर यांच्यासह अनेक सिनेकलाकारही पोहोचले होते. राहाच्या वाढदिवसाची थीम व्यंगचित्रांवर आधारित होती. केकपासून डेकोरेशनपर्यंत सर्व काही व्यंगचित्रांवर आधारित होते. आलिया भट्टची मुलगी राहा भट्ट आता दोन वर्षांची झाली आहे. राहाच्या वाढदिवसानिमित्त आलियाने तिच्या मुलीचे फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावर अनेक सिनेकलाकारांनी कमेंट केल्या.

आलिया भट्टने बॉलिवूडमध्ये १२ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. आलिया भट्ट पहिल्याच चित्रपटापासून सुपरहिट ठरली. आता आलिया भट्टची गणना बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या हिरोईनमध्ये केली जात आहे. आलिया भट्टनेही स्वत: अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आलिया भट्टने दोन वर्षांपूर्वी 14 एप्रिल 2022 रोजी रणबीर कपूरसोबत लग्न केले होते. लग्नानंतर आलिया भट्टने मुलगी राहाला जन्म दिला. 2022 मध्ये या दिवशी मुलगी राहाचा जन्म झाला.

Whats_app_banner