मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आलिया आणि रणबीरने चाहत्यांना दिली गूडन्यूज!
रणबीर आणि आलिया
रणबीर आणि आलिया (HT)
27 June 2022, 11:55 ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 11:55 IST
  • आलियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

बॉलिवूडमधील सध्याचे सर्वांचे आवडते आणि लाडके कपल म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट व रणबीर कपूर. काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर आता रणबीर आलियाने चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ते लवकरच आई-बाबा होणार असल्याचे सांगितले आहे. हा चाहत्यांसाठी सुखद धक्कादच आहे. आलियाने रुग्णालयातील फोटो शेअर करत 'आमचं बाळ.. लवकरच येत आहे' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : अखेर सई ताम्हणकरने दिली प्रेमाची कबुली, पोस्टवरील कमेंट चर्चेत

आलिया भट्टच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनी तर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मौनी रॉय, रिद्दीमा कपूर, रकूल प्रीत, सोनी राजदान आणि इतर काही बॉलिवूड कलाकारांनी आलियाच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

रणबीर आलियाने १४ एप्रिल रोजी लग्न केले. त्यांच्या लग्नाला काही जवळच्या कुटुंबीयांना तसेच काही मोजक्याच मित्रपरिवाला आमंत्रण देण्यात आले होते. त्यांचा विवाहसोहळा रणबीरच्या मुंबईतील राहत्या घरात 'वास्तू' येथे पार पडला. आता रणबीर आणि आलियाने चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग