मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आलियाच्या प्रेग्नंसीवर आई सोनी राजदानची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

आलियाच्या प्रेग्नंसीवर आई सोनी राजदानची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 27, 2022 12:06 PM IST

नुकताच आलिया भट्टने ती प्रेग्नंट असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे.

सोनी राजदान
सोनी राजदान (HT)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना गूजन्यूज दिली आहे. त्यांनी रुग्णालयातील फोटो शेअर करत लवकरच आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली आहे. आता आलियाच्या प्रेग्नंसीवर आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गूडन्यूज देत दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ती रुग्णालयात असल्याचे दिसत आहे. त्यानंतरच्या फोटोमध्ये तिने सिंहचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने 'आमचं बाळ.. लवकरच येत आहे' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : 'बॉइज ३'मधून धैर्य, ढुंग्या, कबीर घालणार पुन्हा एकदा राडा

आलियाच्या प्रेग्नंसीवर तिची आई सोनी राजदानने प्रतिक्रिया दिली आहे. सोनी राजदान यांनी आलियाच्या पोस्टवर कमेंट केली आहे. 'सिंहाच्या आई आणि वडिलांचे अभिनंदन' या आशयाची कमेंट करत त्यांनी हार्ट इमोजी वापरले आहेत. सोनी राजदान यांच्यासोबतच मलायका अरोरा, प्रियांका चोप्रा, मौनी रॉय, रिद्दीमा कपूर, रकूल प्रीत आणि बॉलिवूडमधील इतक कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

<p>सोनी राजदान कमेंट</p>
सोनी राजदान कमेंट (HT)

रणबीर आलियाने १४ एप्रिल रोजी लग्न केले. त्यांच्या लग्नाला काही जवळच्या कुटुंबीयांना तसेच काही मोजक्याच मित्रपरिवाला आमंत्रण देण्यात आले होते. त्यांचा विवाहसोहळा रणबीरच्या मुंबईतील राहत्या घरात 'वास्तू' येथे पार पडला. आता रणबीर आणि आलियाने चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे.

IPL_Entry_Point

विभाग