मला पुन्हा कधीच बाप व्हायचे नाही; डिलिव्हरी रुमबाहेर पत्नीच्या किंकाळ्या ऐकून अभिनेत्याने घेतला निर्णय
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मला पुन्हा कधीच बाप व्हायचे नाही; डिलिव्हरी रुमबाहेर पत्नीच्या किंकाळ्या ऐकून अभिनेत्याने घेतला निर्णय

मला पुन्हा कधीच बाप व्हायचे नाही; डिलिव्हरी रुमबाहेर पत्नीच्या किंकाळ्या ऐकून अभिनेत्याने घेतला निर्णय

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 07, 2024 05:19 PM IST

नुकताच एका प्रसिद्ध अभिनेत्याने एका मुलाखतीमध्ये पुन्हा बाप होणार नाही असे म्हटले आहे. त्याने असे का म्हटले चला जाणून घेऊया...

Ali Asgar
Ali Asgar

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव म्हणजे अली असगर. त्याने आपल्या विनोद बुद्धीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचे लाखो चाहते आहेत. अली हा त्याच्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. पण सध्या खासगी आयुष्यामुळे अली चर्चेत आला आहे. त्याने कुटुंबाशी संबंधीत निर्णय एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे.

पत्नीला डिलिवरीसाठी सोडून अभिनेता गेला शुटिंगवर

अलीने नुकताच अभिनेत्री रुबिना दिलैकच्या पॉडकास्टमध्ये हाजरी लावली होती. यावेळी त्याने पत्नीच्या प्रेग्नंसी काळातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पहिल्या मुलाच्या प्रसूतीच्या वेळी पत्नीला वेदना होत असल्याचे पाहून त्याला फार दुःख झाले. अली असगरने असेही सांगितले की, ती इतकी घाबरली होती की तिने दुसरे मूल न करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्याने त्याच्या पहिल्या मुलाच्या नुयानच्या जन्माची संपूर्ण कथा रुबिना दिलैकबरोबर शेअर केली आहे. त्याने सांगितले की, जेव्हा तो प्रसूतीसाठी घरुन निघाला तेव्हा त्याची पत्नी खूप उत्साहित होती आणि तो तिला हॉस्पिटलमध्ये सोडून शूटिंगसाठी गेला होता.

पत्नीची अवस्था पाहून पुन्हा बाप न होण्याचा घेतला निर्णय

अली असगरने सांगितले की, त्यानंतर त्याच्या पत्नीला पेनचे इंजेक्शन देण्यात आले आणि जेव्हा तो शूटवरुन परतला तेव्हा त्याच्या पत्नीची प्रकृती इतकी बिघडली होती की, तिच्याकडे बघवतही नव्हते. त्याच्या पत्नीच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे होती आणि ती वेदनेने ओरडत होती. याबद्दल बोलताना अली म्हणाला, “माझ्या पत्नीला वेदना होत असल्याचे पाहून मी इतका अस्वस्थ झालो की, नंतर मी कधीच बाप होणार नाही, असे सांगू लागलो. मला तिला पुन्हा एकदा असे दुःख द्यायचे नव्हते आणि तिला अशा परिस्थितीत टाकायचे नव्हते. सलग दोन तास दुखल्यानंतर तिची डिलिव्हरी झाली.”

मुलाच्या जन्मानंतर पत्नीचा पडला विसर

पुढे अली म्हणाला, “तिच्या या त्रासामुळे त्याच्या पत्नीला सी-सेक्शन करावे लागले आणि ऑपरेशनमुळे मुलगा झाला. तसेच मुलावर परिणाम होऊ नये म्हणून मी त्याला घेऊन बाजूला गेलो. माझ्या मनात हा ध्यास कुठून आला हे मला माहीत नाही. त्यानंतर मी अर्धा तास माझ्या मुलांवर लक्ष केंद्रित केले आणि यादरम्यान मी माझ्या पत्नीला पूर्णपणे विसरलो होतो”
वाचा: Pushpa 2 The Rule review: 'पुप्षा २' पाहायला जाताय? थांबा! आधी हे वाचा आणि मग निर्णय घ्या

सोशल मीडियावरही अली बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अनेक फनी रील व्हिडीओ तो पोस्ट करत प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. अलीच्या या रील व्हिडीओला नेटकऱ्यांकडून नेहमीच पसंती मिळालेली पाहायला मिळाली आहे. अभिनय जगतात व सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या या अलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे. त्याने पुन्हा बाप न होण्याचा निर्णय घेतला आहे.

Whats_app_banner