मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  चिंची चेटकीण आता थ्रीडीमध्ये दिसणार; 'अलबत्या गलबत्या' रुपेरी पडद्यावर पाहता येणार!

चिंची चेटकीण आता थ्रीडीमध्ये दिसणार; 'अलबत्या गलबत्या' रुपेरी पडद्यावर पाहता येणार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 15, 2024 05:50 PM IST

नाटककार रत्नाकर मतकरी यांचं ‘अलबत्या गलबत्या’ हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहे.

चिंची चेटकीण आता थ्रीडीमध्ये दिसणार; 'अलबत्या गलबत्या' रुपेरी पडद्यावर पाहता येणार!
चिंची चेटकीण आता थ्रीडीमध्ये दिसणार; 'अलबत्या गलबत्या' रुपेरी पडद्यावर पाहता येणार!

नाटककार रत्नाकर मतकरी यांचं ‘अलबत्या गलबत्या’ हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहे. लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर या नाटकावरून चित्रपट करण्याचा मोठा निर्णय घेतला असून, हे शिवधनुष्य ते पेलणार आहेत. या चित्रपटात अभिनेते वैभव मांगले मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहेत. पुढीलवर्षी १ मे २०२५ ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या टीझरनेच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. आता या चित्रपटासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

आता ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाला रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य तरुण लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर पेलत आहे. वरूणनं आतापर्यंत चित्रपट, वेब सीरिज केल्या आहेत. त्यात ‘मुरांबा’, ‘दो गुब्बारे’, ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच, त्यानं दिग्दर्शित केलेल्या अनेक जाहिरातीही गाजल्या आहेत. आता ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाला तंत्रज्ञानाची जोड देऊन, नव्या रुपात चित्रपट माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात येणार आहे. या चित्रपटला अत्याधुनिक व्हीएफेक्सची जोड दिली जाणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट थ्रीडी मध्ये असल्यामुळे बच्चेकंपनीला एक वेगळाच अनुभव घेता येणार आहे.

लीलाला पूर्ण करावंच लागणार अभिरामला दिलेलं वचन! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार रंजक वळण

बालनाट्यानं घडवलाय इतिहास!

‘अलबत्या गलबत्या’ या चित्रपटाची निर्मिती ‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’चे संजय छाब्रिया, ‘उदाहरणार्थ निर्मित’चे सुधीर कोलते आणि ‘न्यूक्लिअर अॅरो’चे ओंकार सुषमा माने करत आहेत. ‘भालजी पेंढारकर चित्र’ हे या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत. रत्नाकर मतकरी यांनी कथा, कादंबरी, नाटक असे विविध साहित्यप्रकार हाताळले. त्यांची अनेकनाटकं मराठी प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. त्याशिवाय त्यांनी बालरंगभूमीवरही अनेक यशस्वी प्रयोग केले होते. ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटकही त्यापैकीच एक... या बालनाट्यानं इतिहास घडवला.

पालकमंडळीही झाली उत्सुक

‘अलबत्या गलबत्या’ या नाटकातून वैभव मांगले यांनी पुन्हा एकदा बालरंगभूमीला पुनर्जीवन दिले. ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकांनंतर बच्चे कंपनीसोबत त्यांचे पालक देखील रंगभूमीच्या दिशेने वळताना दिसले. देशभरातच नाही तर, जगभरात अनेक विक्रम प्रस्थापित केले. अभिनेते वैभव मांगले यांनी चिंची चेटकीण बनून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता चित्रपटाच्या माध्यमातून हे नाटक एका वेगळ्याच रूपात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यासाठी बच्चे कंपनी सोबतच त्यांचे पालक देखील तितकेच उत्सुक आहेत.

IPL_Entry_Point

विभाग