भर कार्यक्रमात अक्षय कुमारने दिला अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाय अन्...; पाहा नेमकं काय झालं-akshay kumar stepped on alaya f dress video viral ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  भर कार्यक्रमात अक्षय कुमारने दिला अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाय अन्...; पाहा नेमकं काय झालं

भर कार्यक्रमात अक्षय कुमारने दिला अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाय अन्...; पाहा नेमकं काय झालं

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 27, 2024 05:29 PM IST

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने चक्क अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाय दिल्याच दिसत आहे.

भर कार्यक्रमात अक्षय कुमारने दिला अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाय अन्...; पाहा नेमकं काय झालं
भर कार्यक्रमात अक्षय कुमारने दिला अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाय अन्...; पाहा नेमकं काय झालं

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट 'बडे मिया छोटे मियां' हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या सेटवरील काही व्हिडीओ दोघांनी शेअर केले होते. त्यांच्या या व्हिडीओंमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. काल, २६ मार्च रोजी 'बडे मिया छोटे मियां' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा 'बडे मिया छोटे मियां' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यातील आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर व अलाया फर्निचरवाला मंचावर उभे असल्याचे दिसत आहेत. चारही कलाकार हे फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. दरम्यान, अलायाने लाँग टेल असलेला ड्रेस परिधान केला आहे. अलाया ही अक्षय कुमारच्या शेजारीच्या शेजारी उभी असते. फोटोला पोझ देत असताना अचानक अक्षयचा पाय अलायाच्या ड्रेसवर पडतो. बराच वेळ अलाया अक्षयने त्यावरून पाय काढावा याची वाट पाहत होती. नंतर अक्षयला लक्षात आले आणि त्याने पाय काढला. नंतर तो दुसरीकडे जाऊन उभा राहिला.
वाचा: टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारची मजेशीर होळी, व्हिडीओ पाहून येईल हसू

एका यूजरने हा व्हिडीओ पाहून 'नक्कीच मारण्यासाठी असा ड्रेस डिझाइन केला आहे' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'ही काय फॅशन आहे. वर कपडेच नाहीत आणि खाली गरजेपेक्षा जास्त कपडे आहेत' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने आलयाला सुनावले आहे, 'त्याला सांगायचे ना, इतका वेळ वाट पाहण्याची काय गरज होती.' सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: 'आई कुठे काय करते'मधील अभिनेता दिसणार 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये

अक्षय आणि टायगरची चित्रपटाविषयी

बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामुळे दोन्ही स्टार्सची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २६ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आता चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. या चित्रपटात अक्षय आणि टायगर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच मानुषी छिल्लर व अलाया फर्निचरवाला या दोन अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत.