Akshay Kumar: ‘स्त्री २’नंतर ‘भूल भुलैया ३’मध्ये अक्षय कुमार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार? स्वतःच उत्तर देत म्हणाला…
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Akshay Kumar: ‘स्त्री २’नंतर ‘भूल भुलैया ३’मध्ये अक्षय कुमार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार? स्वतःच उत्तर देत म्हणाला…

Akshay Kumar: ‘स्त्री २’नंतर ‘भूल भुलैया ३’मध्ये अक्षय कुमार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार? स्वतःच उत्तर देत म्हणाला…

Published Aug 21, 2024 08:37 AM IST

Akshay Kumar on Bhool Bhulaiyaa 3: ‘स्त्री २’ या चित्रपटानंतर 'भूल भुलैया ३'मध्ये कॅमिओ करणार की नाही, यावर आता अक्षय कुमारने भाष्य केलं आहे.

भूल भुलैया 3
भूल भुलैया 3

Akshay Kumar on Bhool Bhulaiyaa 3 Cameo: 'स्त्री २' या चित्रपटानंतर आता लोक 'भूल भुलैया ३'च्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्टमहिन्याच्या अखेरीस या चित्रपटाचा टीझर येणार असून, दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘भूल भुलैया १’मध्ये विद्या बालनसोबत मुख्य भूमिकेत असल्याने अक्षय कुमारही 'भूल भुलैया ३' मध्ये कॅमिओ करणार असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. पण, खरंच अक्षय कुमार कॅमिओ करणार का? यावर त्याने स्वतःच उत्तर दिले आहे.

'भूल भुलैया ३'मध्ये अक्षय कुमार कॅमिओ करणार असल्याची बातमी समोर आल्यापासून चाहते संभ्रमात पडले आहेत. या अहवालावर विश्वास ठेवून आनंदी व्हावे की, नाही हेच त्यांना समजत नाहीये. हिंदुस्थान टाईम्सने अक्षय कुमारशी संपर्क साधून त्याला प्रेक्षकांच्या मनातील या प्रश्नाचं उत्तर विचारलं. यावेळी अक्षयने आपण 'भूल भुलैया ३'चा भाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अक्षय म्हणाला, ‘नाही, अजिबात नाही. ही फेक न्यूज आहे.’ 

अक्षय कुमारपेक्षा १ रुपया जास्त मागितल्यामुळे संजीव कपूरला मास्टरशेफमधून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता

अक्षय कुमार लवकरच रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी, हा चित्रपट ऑक्टोबर २०२४मध्ये प्रदर्शित होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. याशिवाय अक्षय कुमारचा 'वेलकम टू द जंगल', 'जॉली एलएलबी ३' आणि 'हाऊसफुल ५' हे चित्रपटही चित्रपटगृहात धडकणार आहेत.

‘स्त्री २’मधून जिंकलं मन!

१५ ऑगस्टला रिलीज झालेल्या राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री २'मध्ये अक्षय कुमारने कॅमिओ भूमिका साकारली आहे. त्याची ही भूमिका चाहत्यांना खूप आवडली आहे. त्याच्या प्रत्येक संवादाला प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्याचे चित्र थिएटरमध्ये दिसले. ‘स्त्री २’मधील अक्षय कुमारच्या कॅमिओसह निर्मात्यांनी संकेत दिले आहेत की, तो फ्रँचायझीच्या पुढील चित्रपटात देखील दिसणार आहे. अक्षय कुमारही पुढच्या ‘स्त्री’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारू शकतो.

कधी रिलीज होणार 'भूल भुलैया ३'?

कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’मध्ये विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनीस बज्मी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानी यापूर्वीचा 'भूल भुलैया २' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता, जो बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. 'भूल भुलैया ३' यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

 

Whats_app_banner