मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अक्षय नाही तर माझ्यामुळे फ्लॉप ठरला 'पृथ्वीराज'; दिग्दर्शक म्हणतात-तो पान मसालाच
पृथ्वीराज
पृथ्वीराज
23 June 2022, 21:02 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 21:02 IST
  • अक्षयने आजवर अनेक हिट चित्रपट दिले मात्र 'पृथ्वीराज' च्या बाबतीत तो बजेट इतकीही कमाई करू शकला नाही. त्यामुळे तो सोशल मीडियावरही प्रचंड ट्रोल झाला.

बॉलिवूडचा खिलाडी असणारा लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अक्षयवर 'पृथ्वीराज' त्याच्यामुळे अयशस्वी झाला असा ठपका ठेवण्यात आला आहे. अक्षयने आजवर अनेक हिट चित्रपट दिले मात्र 'पृथ्वीराज' च्या बाबतीत तो बजेट इतकीही कमाई करू शकला नाही. त्यामुळे तो सोशल मीडियावरही प्रचंड ट्रोल झाला. सोबतच चित्रपटाच्या दिग्दर्शकाने देखील अक्षयलाच यासाठी जबाबदार धरलं असल्याच्या देखील अनेक अफवा उठल्या होत्या. मात्र आता या प्रकरणावर चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी (chandraprakash dwivedi) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण असं काहीही बोललो नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, 'प्रत्येक प्रेक्षकाला कोणत्याही अभिनेत्याच्या चित्रपटाला पाहण्याचा किंवा न पाहण्याचा अधिकार आहे. पण अक्षय गेली ३० वर्ष काम करतोय आणि प्रत्येकाला त्याच्यामधील अभिनयाची ताकद माहित आहे. अक्षयने चित्रपटासाठी त्याचं बेस्ट दिलं आहे. अक्षय असा पहिला अभिनेता नाहीये ज्याचा चित्रपट असा फ्लॉप झालाय. पण त्यामुळे त्याला बॉयकॉट करण्याला काहीही अर्थ नाही. अक्षय कोणत्याही पान मसाला ब्रॅण्ड सोबत काम करत असेल किंवा त्याच्या जुन्या कोणत्याही व्यक्तव्यामुळे तुम्ही चित्रपटाला बॉयकॉट कराल तर हे अत्यंत चुकीचं आहे. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांसोबत काहीही संबंध नाही.'

द्विवेदी स्पष्टीकरण देत म्हणाले, 'माझं नाव घेऊन अक्षय बद्दल जे काही छापण्यात येतंय तसं मी काहीही म्हटलं नाही. तो फक्त एक अभिनेता नाहीये तो माझ्यासाठी एक शुभचिंतक आणि मित्रदेखील आहे. तो नसता तर कदाचित चित्रपट देखील तयार झाला नसता. गेल्या चार वर्षात आम्ही एकमेकांना चांगले ओळखायला लागलोय. मी त्याला माझ्या चित्रपटाच्या फ्लॉप होण्यासाठी जबाबदार ठरवलेलं नाही. त्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. मी माझ्या प्रेक्षकांना समजून घेण्यात चुकलो. त्यांना जे अपेक्षित होतं ते मी नाही देऊ शकलो. त्यात अक्षयची काय चूक?' एका मासिकाने द्विवेदी यांनी अक्षयला चित्रपटाच्या अयशस्वी होण्यासाठी जबाबदार धरल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ही बातमी सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाली होती.