भोळा दिसण्याचं नाटक करायचा, भरपूर गर्लफ्रेंड होत्या त्याच्या! ‘या’ अभिनेत्रीने अक्षय कुमारची केली पोलखोल
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  भोळा दिसण्याचं नाटक करायचा, भरपूर गर्लफ्रेंड होत्या त्याच्या! ‘या’ अभिनेत्रीने अक्षय कुमारची केली पोलखोल

भोळा दिसण्याचं नाटक करायचा, भरपूर गर्लफ्रेंड होत्या त्याच्या! ‘या’ अभिनेत्रीने अक्षय कुमारची केली पोलखोल

Nov 06, 2024 01:21 PM IST

Akshay Kumar Girlfriends: बॉलिवूडच्या अनेक टॉपच्या अभिनेत्रींशी अक्षय कुमारचे नाव जोडले गेले आहे. आता एका अभिनेत्रीने अक्षय कुमारच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

Akshay Kumar
Akshay Kumar (PTI)

Akshay Kumar Girlfriends : बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार याने आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. त्यांचे चित्रपट आणि अभिनेत्याचा दानशूर स्वभाव यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. अक्षय कुमार याने आजवर अनेक अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर केली आहे. तर, बॉलिवूडच्या अनेक टॉपच्या अभिनेत्रींशी त्याचे नाव जोडले गेले आहे. आता एका अभिनेत्रीने अक्षय कुमारच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री गुड्डी मारुती यांनी अक्षय कुमारची पोलखोल केली आहे.

बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर गुड्डी मारुती यांनी नेहमीच प्रेक्षकांना खळखळवून हसवले. त्यांनी अक्षय कुमार आणि गोविंदासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गुड्डी यांनी आपल्या सहकलाकारांबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यात त्यांनी अक्षय कुमार याचा एक किस्सा देखील सांगितला.

गुड्डी मारुती यांनी केली अक्षयची पोलखोल

या मुलाखतीत त्यांनी अक्षय कुमारच्या वैयक्तिक आयुष्यासोबातच त्याच्या रोमँटिक अफेअरबद्दलही सांगितले. गुड्डी म्हणाल्या की, ‘अक्षय कुमार सुरुवातीपासूनच इश्कबाज लोकांपैकी एक होता आणि त्याच्या अनेक गर्लफ्रेंड्सही होत्या.’ एका मुलाखतीत सिद्धार्थ काननशी बोलताना गुड्डी यांनी म्हटले की, खिलाडी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय महिलांमध्ये खूप लोकप्रिय होता. त्याच्या अनेक मैत्रिणी होत्या. मला दोन किंवा तीन माहित आहेत, पण त्याने किती लोकांना डेट केले हे माहीत नाही.

Akshay Kumar : दिलदार खिलाडी कुमार! ‘या’ कारणासाठी अक्षयने अयोध्येच्या राम मंदिरात दान केले १ कोटी

अनेक स्त्रियांची मने तोडली!

गुड्डी पुढे म्हणाल्या की, अक्षयसोबत सेटवर काम करणे हा नेहमीच एक चांगला अनुभव होता. अक्षय एकाच वेळी अनेक महिलांना डेट करणार माणूस नाही. कारण तो त्यावेळी हार्टब्रेकर म्हणून ओळखला जात होता. तो आपण भोळा असल्याचा आव आणायचा, पण नंतर त्याच्याबद्दल अनेक किस्से ऐकायला मिळायचे.

ट्विंकल खन्नासोबत केले लग्न!

रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टी यांसारख्या अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेल्यानंतर अक्षय कुमारने ट्विंकल खन्नासोबत लग्न केले. त्यांची प्रेमकहाणी ही बॉलिवूडमधील सर्वात क्युट प्रेमकथा आहे. ९०च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा दोघेही इंडस्ट्रीत नाव कमावत होते, तेव्हा त्यांच्या रोमान्सला सुरुवात झाली. एका मॅगझिनच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती. त्यांच्या मैत्रीचे लवकरच प्रेमात रुपांतर झाले.

ट्विंकलने ठरवले होते की, जर तिचा ‘मेला’ हा चित्रपट चांगला चालला नाही, तर ती अक्षयसोबत लग्न करेल. जेव्हा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, तेव्हा ट्विंकलने आपले वचन पाळले. या जोडीने १७ जानेवारी २००१ रोजी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केले. त्यांना आरव आणि नितारा ही दोन मुले आहेत.

Whats_app_banner