Akshay Kumar Donate 1 Cr : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या दिलदार स्वभावामुळे खूप प्रसिद्ध आहे. तो नेहमीच गरजूंना मदतीचा हात पुढे करत असतो. अक्षय कुमारबद्दल सर्वांनाच माहित आहे की, तो एक उत्तम अभिनेता तसेच चांगल्या मनाचा माणूस आहे. तो नेहमीच गरजूंना मदत करतो. आता या अभिनेत्याने पुन्हा एकदा असे एक उदात्त काम केले आहे की, त्याबद्दल जाणून तुम्हीही त्याचे कौतुक कराल. अक्षयने अयोध्येत रोज माकडांना खाऊ घालण्याचा निर्णय घेतला आहे. राम मंदिराला १ कोटी रुपयांची देणगी देत त्याने माणसांनाच नव्हे, तर प्राण्यांनाही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभू रामाचा आशीर्वाद घेत त्याने हे चांगले काम केले आहे. त्याने आपले वडील-आई आणि सासरे राजेश खन्ना यांच्या नावाने हे उदात्त दान केले आहे.
टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, अक्षय कुमार जगद्गुरू स्वामी राघवाचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालवल्या जाणाऱ्या अंजनेय सेवा ट्रस्टच्या माध्यमातून हा उपक्रम करत आहे. या पुण्य कामासाठी जेव्हा ट्रस्टच्या लोकांनी अक्षयशी संपर्क साधला, तेव्हा अक्षयने दान करण्याचा निर्णय घेतला. त्याने या उदात्त कार्याला होकार तर दिलाच, पण दान करून प्राण्यांचे रक्षण करण्याचेही ठरवले.
ट्रस्टच्या संस्थापक प्रिया गुप्ता यांनी अक्षयचे कौतुक करत म्हटले की, अभिनेता केवळ त्याच्या कुटुंबाला आणि सहकाऱ्यांनाच नव्हे तर, समाजालाही मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. अक्षयने याबद्दल कळताच लगेच पैसे दान केले. त्याने हे दान आपले आई-वडील हरी ओम आणि अरुण भाटिया आणि सासरे राजेश खन्ना यांच्या नावाने केले आहे. अक्षयने यासाठी केवळ देणगीच दिली नाही तर, तो यापुढे अयोध्येतील नागरिकांची आणि प्राण्यांचीही काळजी घेणार असल्याचे वाचन त्याने दिले.
अक्षयच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर तो आता ‘वेलकम टू जंगल’, ‘हेरा फेरी ३’, 'हाऊसफुल ५' आणि ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. या दिवाळीत तो रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. मात्र, अक्षय कुमारच्या एन्ट्रीमुळे आता प्रेक्षकांच्या अपेक्षा दुणावल्या आहेत.
संबंधित बातम्या