Akshay Kumar: गर्लफ्रेंडला सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जायचा अन्…; अक्षय कुमारची डेटिंग ट्रीक माहितीये का?-akshay kumar birthday special know his dateing tricks ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Akshay Kumar: गर्लफ्रेंडला सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जायचा अन्…; अक्षय कुमारची डेटिंग ट्रीक माहितीये का?

Akshay Kumar: गर्लफ्रेंडला सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जायचा अन्…; अक्षय कुमारची डेटिंग ट्रीक माहितीये का?

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 09, 2024 07:48 AM IST

अक्षय कुमार नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. एकेकाळी त्याचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. चला जाणून घेऊया अक्षयच्या खासगी आयुष्याविषयी...

Akshay Kumar raveena
Akshay Kumar raveena

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आज ९ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. पंजाबमधील अमृतसह येथे जन्म झालेल्या अक्षयचे खरे नाव राजील हरी ओम भाटिया आहे. आज म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी अक्षय त्याचा ५७वा वाढदिवस साजरा करत आहे. आजघडीला अक्षय कुमार जरी बॉलिवूडचा सुपरस्टार असला तरी १९९१ साली प्रदर्शित झालेल्या सौगंध या फ्लॉप चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. एकेकाळी तो त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असायचा. चला जाणून घेऊया अक्षय कुमारच्या खासगी आयुष्याविषयी...

अक्षय कुमारचा पहिला सिनेमा

९ सप्टेंबर १९६७ रोजी जन्मलेल्या अक्षयने आपल्या तीस वर्षांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अ‍ॅक्शनपट असो, कॉमेडी असो की फॅमिली ड्रामा, अक्षय कुमार याने प्रत्येक व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारली आहे. अक्षय कुमारने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. मॉडेलिंगचे फोटो पाहिल्यानंतरच अक्षय कुमार याला पहिल्यांदा 'दीदार' चित्रपटासाठी साईन करण्यात आले होते. मात्र, त्याचा 'सौगंध' हा चित्रपट आधी प्रदर्शित झाला. १९९४मध्ये एका वर्षात त्याचे तब्बल ११ चित्रपट प्रदर्शित झाले होते. चित्रपटांसोबतच अक्षयचे खासगी आयुष्य कायम चर्चेत राहिले आहे.

अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर

अक्षयचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. पण एक दिवस अचानक अक्षयने ट्विंकल खन्नाशी लग्न केले. ते पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अक्षय कुमारबाबत वक्तव्य केले होते. त्याने अक्षय मुलींसोबत कोणती ट्रीक वापरायचा याचा खुलासा केला होता. एकेकाळी अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. शिल्पा डेट करत असतानाच अक्षयने अचानक ट्विंकल खन्नाशी लग्न करुन सर्वांनाच धक्का दिला होता. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये शिल्पाने अक्षय मुलींचे मन वळवण्यासाठी काय करत होता हे सांगितले आहे.

शिल्पाने सांगितली अक्षयची ट्रीक

'माझ्या आयुष्यात त्यावेळी व्यावसायिकदृष्ट्या सर्वकाही ठिक सुरु होते. मात्र खासगी आयुष्यात अनेक गोष्टी घडत होत्या. अनेक चढ-उतार आले होते. अक्षय त्याच्या गर्लफ्रेंडला रात्री उशिरा मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात घेऊन जात असे आणि तिच्याशी लग्न करण्याचे तिथे वचन देत असे. मात्र, परत त्याच्या आयुष्यात एखादी मुलगी आली की, तो दिलेले वचन विसरून जायचा' असे शिल्पा म्हणाली होती.

त्यापूर्वी शिल्पाने एका मुलाखतीमध्ये अक्षयने केवळ तिचा वापर केल्याचे म्हटले होते. 'अक्षयने केवळ माझा वापर केला. आम्ही दोघे रिलेशनशीपमध्ये होतो. पण जेव्हा त्याच्या आयुष्यात दुसरी अभिनेत्री आली तेव्हा त्याने मला सोडून दिले. तो एकमेव व्यक्ती आहे ज्याचा मला प्रचंड राग येतो. कारण त्याने फसवले' असे म्हटले होते.
वाचा: अरबाजच्या जागी सूरज असता तर निक्कीला काय म्हणाला असता? 'माझ्या बच्चा' पाहा मजेशीर व्हिडीओ

बॉलिवूडचा खिलाडी

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 'खिलाडी कुमार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षयने त्याच्या करिअरमध्ये असे ८ चित्रपट केले, ज्यांच्या नावात 'खिलाडी' आहे. त्यामुळे तो बॉलिवूडमध्ये ‘खिलाडी कुमार’ या नावाने ओळखू लागले. अक्षय कुमार ते ‘खिलाडी’ कुमार बनण्यापर्यंतच्या या प्रवासात त्याने 'खिलाडी', 'मैं खिलाडी तू अनाडी', 'सबसे बडा खिलाडी', 'खिलाडी ४२०', 'खिलाडीयों का खिलाडी', 'मिस्टर अँड मिसेस खिलाडी', 'इंटरनॅशनल' खिलाडी' आणि 'खिलाडी ७८६'सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

Whats_app_banner
विभाग