टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारची मजेशीर होळी, व्हिडीओ पाहून येईल हसू
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारची मजेशीर होळी, व्हिडीओ पाहून येईल हसू

टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारची मजेशीर होळी, व्हिडीओ पाहून येईल हसू

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 25, 2024 12:04 PM IST

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ हे त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. सध्या सोशल मीडियावर दोघांचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारची मजेशीर होळी, व्हिडीओ पाहून येईल हसू
टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारची मजेशीर होळी, व्हिडीओ पाहून येईल हसू

आज संपूर्ण देशभरात रंगपंचमी हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. या सणाला रंगाची उधळ केली जाते. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण हा सण साजरा करताना दिसत आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफचा होळी खेळतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार हा त्याच्या बंगल्यामधून बाहेर पडताना दिसत आहे. तेवढ्यात बंगल्या बाहेर रंगाच्या पाण्याने भरलेली बादली घेऊन उभा असलेला टायगर श्रॉफ येतो आणि अक्षय कुमारच्या अंगावर संपूर्ण पाण्याने भरलेली बादली ओतणार असतो. तेवढ्यात अक्षय हातात असलेला नारळ त्याच्या दिशेने फेकल्याची अॅक्शन करतो. ते पाहून टायगर घाबरतो आणि ती पाण्याची बादली स्वत:च्या अंगावर ओततो. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.
वाचा: हंसल मेहताची क्राईम थ्रिलर स्टोरी, अमृता खानविलकरचा जबरदस्त अभिनय

सध्या सोशल मीडियावर अक्षय आणि टायगर श्रॉफच्या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. एका यूजरने या व्हिडीओवर कमेंट करत 'अक्षय कुमारचा दरारा पाहिलात ना..' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'ही नारळाची युक्ती खूप चांगली आहे' असे म्हटले. तिसऱ्या एका यूजरने 'अक्षयने लढवलेली शक्कल खूप चांगली आहे.. मी ही असे करुन पाहातो' अशी कमेंट केली आहे.
वाचा: 'या' कारणामुळे इम्रान हाश्मीने आलियासोबत किसिंग सीन देण्यास दिला होता नकार

अक्षय आणि टायगरची चित्रपटाविषयी

बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामुळे दोघांची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या सेटवरचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Whats_app_banner