मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Selfiee Review: अक्षय, इमरानचा ‘सेल्फी’ हिट होणार की फ्लॉप? पहा नेटकरी काय म्हणतात...

Selfiee Review: अक्षय, इमरानचा ‘सेल्फी’ हिट होणार की फ्लॉप? पहा नेटकरी काय म्हणतात...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 24, 2023 01:20 PM IST

Selfiee Twitter Review: ‘सेल्फी’ प्रदर्शित होताच आता हा चित्रपट ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतरच या चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या. मात्र….

Selfiee
Selfiee

Selfiee Twitter Review: बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेता इमरान हाश्मीही मुख्य भूमिकेत दिसला आहे. ‘सेल्फी’ प्रदर्शित होताच आता हा चित्रपट ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतरच या चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या. मात्र, आता लोकांच्या प्रतिक्रिया पाहून वेगळंच चित्र दिसत आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटावर प्रेक्षक ट्विटरद्वारे आपली मते मांडत आहेत. काही युजर्स म्हणत आहेत की, ‘सेल्फी’ हा चित्रपट फारच फ्लॉप होणार आहे. तर, काही जन हा चित्रपट पैसा वसूल असल्याचे म्हणत आहेत. ‘सेल्फी’ पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत जाणून घेऊया...

काही युजर्सनी हा चित्रपट चित्रपटगृहात पाहण्यालायक नसल्याचेही म्हटले आहे. तसेच, मूळ मल्याळम चित्रपट 'ड्रायव्हिंग लायसन्स' हा या चित्रपटापेक्षा १००पट चांगला असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी एका युजरने ‘सेल्फी’ हा चित्रपट कंटाळवाणा असल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही, तर काही युजर्स अक्षय कुमारकडे त्यांचे पैसे परत करण्याची मागणीही करत आहेत. आता, अक्षय कुमारचा सेल्फी चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

एकीकडे काही युजर्स या चित्रपटावर टीका करत असतानाच, काही युजर्स मात्र अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीच्या ‘सेल्फी’ या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे. काहींनी हा चित्रपट पैसावसूल असल्याचे म्हटले आहे. अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी स्टारर हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट पहिल्याच दिवशी ७ ते १० कोटींची कमाई करू शकतो. या चित्रपटाची आगाऊ बुकिंगही खूपच कमी झाली आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत दिसला आहे. यासोबतच अभिनेत्री नुसरत भरुचा आणि डायना पेंटी यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. अक्षय कुमार स्टारर चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन, मॅजिक फ्रेम्स, पृथ्वीराज प्रॉडक्शन, केप ऑफ गुड फिल्म्स आणि स्टार स्टुडिओज यांनी केली आहे. ‘सेल्फी’ हा चित्रपट २०१९मध्ये आलेल्या मल्याळम चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा रिमेक आहे.

IPL_Entry_Point