Akshay Kelkar Girlfriend: मराठी अभिनेता आणि 'बिग बॉस मराठी ४'चा विजेता अक्षय केळकर याने अखेर त्याची गर्लफ्रेंड 'रमा' चाहत्यांच्या समोर आणली आहे. बिग बॉसच्या घरात असताना अक्षय नेहमीच त्याच्या गर्लफ्रेंड रमाबद्दल बोलताना दिसायचा. त्यामुळे त्याला अनेक वेळा प्रश्न विचारला जात होता की, 'अक्षय, तुझी रमा कोण आहे?' अखेर, अक्षयने आपल्या सोशल मीडिया पोस्टवर 'आज मी रमाला समोर आणणार', असं सांगितलं आणि रमा कोण हेही स्पष्ट केलं.
अक्षय केळकरची रमा म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून, प्रसिद्ध गायिका आणि गीतकार साधना काकतकर आहे. साधना काकतकर हे एक संगीत विश्वातील सुप्रसिद्ध नाव आहे. साधना हिने अनेक मराठी गाण्यांमध्ये गायन आणि गीत लेखन केलं आहे. अक्षयच्या बहिणीच्या लग्नातही साधना काकतकर हजर होती. त्याच वेळी दोघांचे जवळचे संबंध असल्याचे दिसून आले होते. त्यावेळी साधनाने ‘दोन कटिंग ३’ या अक्षय केळकरच्या म्युझिक अल्बमसाठी गायिका आणि गीतकार म्हणून काम केलं होतं. या अल्बममधील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
अक्षय आणि साधना यांचे हे नाते गेल्या १० वर्षांपासूनचे आहे. दोघंही एकमेकांचे चांगले मित्र असून, त्यांचे प्रेमही आता चाहत्यांसमोर आले आहे. इतकी वर्ष अक्षय केवळ 'रमा' म्हणत आणपल्या प्रेमाची कबुली देत होता. मात्र, आता अक्षयने सर्वांसमोर येऊन आपले प्रेम व्यक्त केलं आहे. त्याच्या या पोस्टमध्ये अक्षयने असेही लिहिले आहे, 'तर ही माझी रमा… उद्या आम्हाला १० वर्ष पूर्ण होतायत… म्हंटल एक दिवस आधीच सांगावं.. म्हणून… बापरे, फाइनली सांगतोय मी… पण काहीही झाल तरी i love you मी फक्त तुमचाच आहे आणि आता आम्हीही…'.
अक्षयच्या या भावनिक पोस्टने त्याच्या चाहत्यांना आनंदित केले आहे. अक्षय केळकर याने आपल्या गर्लफ्रेंडचा सोशल मिडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. अक्षय आणि साधना यांच्या प्रेमाची गोष्ट त्याच्या फॅन्ससाठी एक रोमांचक आनंदाची बातमी ठरली आहे.
येत्या एप्रिल महिन्यात अक्षय आणि साधना काकतकर विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा देखील जोरात सुरू आहे. अक्षयने आपल्या गर्लफ्रेंडचा चेहरा दाखवल्यानंतर आता चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. अक्षय केळकरने या वर्षांत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. 'अबीर गुलाल' सारख्या लोकप्रिय मालिकेमध्ये काम करून त्याने स्वत:ला एक आघाडीचा अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे. त्याच्या करिअरचा यशस्वी मार्ग आणि वैयक्तिक जीवनातील आनंद या दोन्ही बाबी त्याच्या चाहत्यांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. अक्षयने आता त्याच्या नात्याची जाहीर कबुली देताच आता तो लग्न कधी करणार, यांची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
संबंधित बातम्या