मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Aarti Vilas Borade HT Marathi
May 03, 2024 08:57 AM IST

Ajinkya Deo Birthday: आज ३ मे रोजी अभिनेते अजिंक्य देव यांचा वाढदिवस आहे. त्यांनी मराठीसोबत बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये काम केले आहे. त्यांच्या हॉलिवूड चित्रपटाविषयी तुम्हाला माहिती आहे का..

अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी
अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

अभिनय आणि लूकच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे अजिंक्य देव. आज ३ मे रोजी अजिंक्य देव यांचा वाढदिवस आहे. त्यांनी वयाची ६० वर्षे ओलांडली आहेत. ते त्यांचा ६१वा वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा करताना दिसत आहेत. अजिंक्य देव यांनी काही हॉलिवूड चित्रपटांमध्ये ही काम केले आहे. तुम्हाला त्यांच्या या चित्रपटाविषयी माहिती आहे का? चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

अजिंक्य देव यांचा जन्म ३ मे १९६३ रोजी या मायानगरीमध्ये झाला. अभिनयाचा वारसा अजिंक्य देव यांना त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला होता. अभिनेते अजिंक्य देव हे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांचे पूत्र आहेत. वयाच्या २२ व्या वर्षी अजिंक्य देव यांनी 'अर्धांगी' या मराठी चित्रपटात काम करत सिनेसृष्टीत पदार्पण केले. केवळ मराठी चित्रपटाच नव्हे, तर त्यांनी आपल्या अभिनयाचे दाखले हॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही दिले आहेत.
वाचा: 'तिकडे वडिलांना अग्नी देत होते आणि मी हास्यजत्रेच्या खूर्चीत', प्रसाद ओकने सांगितला धक्कादायक अनुभव

अजिंक्य देव यांच्या अभिनयाची भूरळ

अतिशय हुशार, हरहुन्नरी असे कलाकार आणि दिमाखदार व्यक्तिमत्व म्हणून अभिनेते अजिंक्य देव ओळखले जातात. त्यांच्या आवाजातील रुबाबदारपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खास पैलू होता. मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रगल्भ अभिनेते म्हणून अजिंक्य देव कायमच ओळख गेले आहेत. केवळ अभिनयच नव्हे, तर त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाची देखील प्रेक्षकांना भुरळ पडली.
वाचा: 'विकृत चाळे' म्हणून ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्री हेमांगी कवीचे सडेतोड उत्तर

अजिंक्य देव यांचा हॉलिवूड सिनेमा

अजिंक्य देव यांच्या १९८७मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सर्जा' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याच वर्षी त्यांनी 'संसार' या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले. ‘संसार’ या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या दीराची भूमिका साकारली होती. यानंतर १९९६मध्ये अजिंक्य देव यांनी ‘द पीकॉक स्प्रिंग’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१९मध्ये आलेल्या ‘द वॉरीयर क्वीन ऑफ झांसी’ या हॉलिवूड चित्रपटात अजिंक्य देव यांनी तात्या टोपेंची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी अजिंक्य देव यांचा 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.
Heeramandi Review: अंगावर शहारे आणणारी सीरिज! संजीदा शेख सोनाक्षी सिन्हा हिचावर भारी

IPL_Entry_Point

विभाग