मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ajinkya Deo: अजिंक्य देव आणि अश्विनी भावे २५ वर्षांनंतर एकत्र, दिसणार 'या' चित्रपटात

Ajinkya Deo: अजिंक्य देव आणि अश्विनी भावे २५ वर्षांनंतर एकत्र, दिसणार 'या' चित्रपटात

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 13, 2024 12:14 PM IST

Ajinkya Deo: मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एकेकाळी प्रेक्षकांची मने जिंकणारी जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे. आता जवळपास २५ वर्षांनंतर हे दोन्ही कलाकार एकत्र दिसणार आहेत.

Ajinkya Deo and Ashwini Bhave: २५ वर्षानंतर अजिंक्य देव आणि अश्विनी भावे एकत्र
Ajinkya Deo and Ashwini Bhave: २५ वर्षानंतर अजिंक्य देव आणि अश्विनी भावे एकत्र

मराठी इंडस्ट्रीमध्ये एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी जोडी म्हणजे अभिनेता अजिंक्य देव आणि अभिनेत्री अश्विनी भावे. या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण गेल्या जवळपास २५ वर्षांपासून हे कलाकार एकत्र दिसले नाहीत. आता ही जोडी पुन्हा एका नव्या चित्रपटात एकत्र पाहायला मिळणार आहे. चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे.

आजवर रुपेरी पडद्यावर नायक नायिकेच्या अनेक लोकप्रिय जोड्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवणारी अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे. लवकरच पुन्हा एकदा ही जोडी ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रसिक दरबारी हजेरी लावणार आहे. प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या सुरेख टीझर नंतर हा चित्रपट रसिकांसाठी वेगळी ट्रीट असणार हे नक्की.
वाचा: 'मुंज्या' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! चार दिवसात कमावले कोट्यवधी रुपये

चित्रपटाविषयी जाणून घ्या

अजिंक्य देव आणि अश्विनी भावे ‘घरत गणपती’ या चित्रपटात शरद घरत आणि अहिल्या घरत या व्यक्तिरेखा ते साकारणार आहेत. या चित्रपटात अजिंक्य देव आपल्याला कुटुंबवत्सल पती, प्रेमळ वडिल अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या करारी आईची व्यक्तिरेखा अश्विनी भावे साकारणार आहेत.
वाचा: 'हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी,' केतकी चितळेची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

ट्रेंडिंग न्यूज

कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?

‘घरत गणपती’ हा भव्य चित्रपट २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
वाचा: सोनाक्षी सिन्हा करणार बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न? अभिनेत्रीने स्वत: दिली प्रतिक्रिया

२५ वर्षांपूर्वी केले होते एकत्र काम

याआधी ‘शाब्बास सूनबाई’,‘मायेची सावली’,‘चल गंमत करू’, ‘सरकारनामा’ या चित्रपटांद्वारे आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावर चांगलीच खुलली आता २५ वर्षांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करण्याचा आनंद व्यक्त करीत, आमची केमिस्ट्री रसिकांना आनंद देईल, असं हे दोघे सांगतात. चित्रपटाचा सुंदर विषय व आमचे काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असा विश्वासही दोघांनी व्यक्त केला.आधीच्या चित्रपटातील या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली असल्याने ही जोडी पुन्हा एकत्र असणं हा ‘घरत गणपती’ चित्रपटाचा सर्वात मोठा ‘प्लस पॉइंट’ आहे. श्री गणराया’च्या आगमनाच्या निमित्ताने घरत कुटुंबातल्या अनुबंधाची हलकी-फुलकी गोष्ट ‘घरत गणपती’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.

WhatsApp channel