मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘शैतान’ ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज; घरबसल्याही पाहता येणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

‘शैतान’ ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज; घरबसल्याही पाहता येणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 01, 2024 08:19 AM IST

‘शैतान’ हा चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. चला तर जाणून घेऊया कधी आणि कुठे रिलीज होणार ‘शैतान’ हा चित्रपट....

‘शैतान’ ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज; घरबसल्याही पाहता येणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या...
‘शैतान’ ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज; घरबसल्याही पाहता येणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, आर माधवन आणि अभिनेत्री ज्योतिका स्टारर 'शैतान' हा चित्रपट ८ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चार आठवडे उलटून गेले तरी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपली पकड मजबूत ठेवूनच आहे. २३ दिवसांत या चित्रपटाचे एकूण कलेक्शन १३७ कोटी रुपये झाले आहे. ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळणार हे स्पष्ट झाले होते. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. आता ज्यांना चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहता आलेला नाही, ते या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट बघत आहेत. आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. चला तर जाणून घेऊया कधी आणि कुठे रिलीज होणार ‘शैतान’ हा चित्रपट....

चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास ८ आठवड्यांनंतर एखादा चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जातो. त्यानुसार 'शैतान' चित्रपट मे महिन्यात ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सकडे आहेत. रिपोर्ट्सनुसार, 'शैतान'चा प्रीमियर ३ मे रोजी नेटफ्लिक्सवर होऊ शकतो. मात्र, प्रेक्षक अधिकृत घोषणा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

जान्हवी आणि शिखरचं ठरलं? ‘पापा’ बोनी कपूरनं केलं होणाऱ्या जावयाचं तोंड भरून कौतुक! म्हणाले...

काय आहे चित्रपटाची कथा?

चित्रपटाची कथा कबीर (अजय देवगण), ज्योती (ज्योतिका) आणि त्यांच्या दोन मुलांची आहे. कबीर आणि त्याच सुखी चौकोनी कुटुंब खूप आनंदी आहे. पण, एक दिवशी त्यांच्या आयुष्यातील सगळ्याच गोष्टी अचानक बदलून जातात, जेव्हा एक अनोळखी व्यक्ती वनराज (आर माधवन) त्यांच्या घरी येतो. तो काळ्या जादूच्या मदतीने कबीरची मुलगी जान्हवीला आपल्या ताब्यात घेतो. कबीर आणि ज्योती त्याच्या मागण्या मान्य करण्यास नकार देतात. वनराज जेव्हा कुटुंबाला त्रास देऊ लागतो, तेव्हा कथेला रंजक वळण लागते. वाईट कितीही मोठे असले तरी, शेवटी चांगल्यासमोर हरते हीच या चित्रपटाची कथा आहे.

कपिल शर्माच्या शोमध्ये साडे सहा वर्षानंतर परतली ‘गुत्थी’; पहिल्याच एपिसोडमध्ये उडवली धमाल

'शैतान' हा गुजराती हिट 'वश'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'क्वीन' फेम दिग्दर्शक विकास बहल यांनी केले आहे. या चित्रपटाच्या वर्ल्डवाईड कलेक्शनबद्दल बोलायचे तर, 'शैतान'ने परदेशातही मोठी कमाई केली आहे. जिओ स्टुडिओच्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करत सांगण्यात आले की, 'शैतान'ने आतापर्यंत जगभरात १९५.७२ कोटी रुपये कमावले आहेत. लवकरच हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणार आहे.

WhatsApp channel