रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे सर्व मोठे चेहरे दिसले होते. ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट चित्रपटगृहात पाहता आला नाही, ते ओटीटीवर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो. कुठे आणि कधी हा चित्रपट पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया...
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, १ नोव्हेंबर रोजी रिलीज झालेला सिंघम अगेन हा चित्रपट २७ डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सिंघम अगेनच्या कथानकाबद्दल बोलायचे झाले तर रामायणाशी जोडून हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. चित्रपटाच्या बॅकग्राऊंडमध्ये सीताचे झालेले हरण दाखावण्यात आले आहे. अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या करिना कपूरचे अपहरण होते. या चित्रपटात रणवीर सिंग, अजय देवगण, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात अर्जुन कपूरने खलनायकाची भूमिका साकारली आहे.
वाचा: पदेशात स्थायिक झालेली माधुरी दीक्षित भारतात का परतली? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा
सिंघम अगेन हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अर्जुन कपूरला त्याच्या भूमिकेसाठी खूप प्रेम मिळत आहे. सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत, ज्यात लिहिले आहे की, अर्जुन कपूरने शानदार पुनरागमन केले आहे. रोहित शेट्टीनेही एका पॉडकास्टमध्ये अर्जुन कपूरचे कौतुक केले आहे. त्याने सांगितले होते की, स्वत: अर्जुन कपूरने त्याला चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी विचारले होते.