मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shaitaan Box Office: बॉक्स ऑफिसवर अजय-आर माधवनचा जलवा, 'शैतान'च्या कमाईत वाढ

Shaitaan Box Office: बॉक्स ऑफिसवर अजय-आर माधवनचा जलवा, 'शैतान'च्या कमाईत वाढ

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 10, 2024 09:04 AM IST

Shaitaan Box office collection Day 2: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि आर माधवन महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या 'शैतान' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. आता चित्रपटाने किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Shaitaan Box office collection Day 2
Shaitaan Box office collection Day 2

Ajay Devgan Shaitaan Box office collection: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'शैतान' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत अभिनेता आर माधवन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली होती. हा चित्रपट ८ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने ठिकठाक कमाई केली होती. आता दुसऱ्या दिवशी चित्रपटाने किती रुपयांची कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात.

दिग्दर्शक विकास बहल यांचा 'शैतान' हा पहिला हॉरर चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि आर माधवन मुख्य भूमिकेत असल्यामुळे चित्रपटाची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. एकंदरीत 'शैतान' चित्रपटाचा रिव्ह्यू पाहाताच चित्रपटाची कथा चाहत्यांना आणि क्रिटिक्सला चांगली वाटली आहे. आता दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा: प्रियांका चोप्राची बहीण होणार केजरीवालांची सून होणार; लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा

विकेंडला कमाईत वाढ

'शैतान' हा चित्रपट पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना घाबरवण्यात सफल ठरला आहे. चित्रपटात आर माधवन निगेटीव्ह भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा अनेक ठिकाणी तुम्हाला घाबरवेल तर काही ठिकाणी असे वाटेल की उगाचच काही सीन्स चित्रपटामध्ये जबरदस्ती भरले आहेत. चित्रपटाने अडवान्स बुकींगनेच सर्वांचे लक्ष वेधले होते. पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी चित्रपटाने १४.५० कोटी रुपयांची कमाई केली. तर शनिवारी चित्रपटाने १८.२५ कोटी रुपये कमावले. एकूण चित्रपटाने ३३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाचा: तो डुकरासारखा खातो… सलमानविषयी अभिनेत्यानं केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा

अजय देवगणच्या कामाविषयी

अभिनेता अजय देवगणच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 'शैतान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एण्ट्री केली आहे. त्यानंतर आता अजयचे आणखी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मैदान, रेड २, सिंघम अगेन आणि औरों में कहा दम था हे अजयचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

इतर चित्रपटांना टक्कर

यंदाच्या वर्षात अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे 'शैतान' चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करतो हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. यंदाच्या वर्षात दीरिता आणि ऋतिकच्या फायटर या चित्रपटाने पहिल्या दिवशी २४.६० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे 'शैतान' या चित्रपटाकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या चित्रपटाने तेरी बातों में ऐसा उलझा जिया आणि आर्टिकल ३७०ला मागे टाकले आहे.

IPL_Entry_Point