मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shaitaan Box office Day 1: 'शैतान' ओपनिंग डेला पास की नापास, जाणून घ्या पहिल्या दिवसाची कमाई

Shaitaan Box office Day 1: 'शैतान' ओपनिंग डेला पास की नापास, जाणून घ्या पहिल्या दिवसाची कमाई

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 09, 2024 08:50 AM IST

Shaitaan Box office collection Day 1: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि आर माधवन महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या 'शैतान' या चित्रपटाने किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Shaitaan Box office collection
Shaitaan Box office collection

Ajay Devgan Shaitaan Box office collection: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'शैतान' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत अभिनेता आर माधवन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली होती. हा चित्रपट ८ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. आता पहिल्याच दिवशी चित्रपटाने किती रुपयांची कमाई केली हे जाणून घेऊया...

दिग्दर्शक विकास बहल यांचा 'शैतान' हा पहिला हॉरर चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि आर माधवन मुख्य भूमिकेत असल्यामुळे चित्रपटाची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. एकंदरीत 'शैतान' चित्रपटाचा रिव्ह्यू पाहाताच चित्रपटाची कथा चाहत्यांना आणि क्रिटिक्सला चांगली वाटली आहे. आता पहिल्याच दिवशी चित्रपटाने किती कमावले हे जाणून घेऊया...
वाचा: 'चला हवा येऊ द्या'घेणार प्रेक्षकांचा निरोप! कधी असणार शेवटचा एपिसोड?

पहिल्याच दिवशी बंपर कमाई

'शैतान' हा चित्रपट पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना घाबरवण्यात सफल ठरला आहे. चित्रपटात आर माधवन निगेटीव्ह भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा अनेक ठिकाणी तुम्हाला घाबरवेल तर काही ठिकाणी असे वाटेल की उगाचच काही सीन्स चित्रपटामध्ये जबरदस्ती भरले आहेत. चित्रपटाने अडवान्स बुकींगनेच सर्वांचे लक्ष वेधले होते. पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी चित्रपटाने १४.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता विकेंडला चित्रपट चांगली कमाई करणार असल्याचे म्हटले जात आहे.
वाचा: काजल अग्रवालसोबत चाहत्याचे गैरवर्तन, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

इतर चित्रपटांना टक्कर

यंदाच्या वर्षात अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे 'शैतान' चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करतो हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. यंदाच्या वर्षात दीरिता आणि ऋतिकच्या फायटर या चित्रपटाने पहिल्या दिवशी २४.६० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे 'शैतान' या चित्रपटाकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या चित्रपटाने तेरी बातों में ऐसा उलझा जिया आणि आर्टिकल ३७०ला मागे टाकले आहे. तेरी बातों में ऐसा उलझा जिया चित्रपटाने पहिल्या दिवशी ६.७ कोटी कमावले आहेत. तर आर्टिकल ३७०ने ५.९ कोटी रुपये कमावले आहेत. शैतान चित्रपटाने या दोन्ही चित्रपटांना मागे टाकले आहे. आता येत्या विकेंडला चित्रपट किती कमाई करतो हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

WhatsApp channel