मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अजय देवगण आणि आर माधवन यांचा 'शैतान' येणार ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

अजय देवगण आणि आर माधवन यांचा 'शैतान' येणार ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 29, 2024 07:51 AM IST

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'शैतान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात अजय देवगण आणि आर माधवन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

अजय देवगण आणि आर माधवन यांचा 'शैतान' येणार ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार?
अजय देवगण आणि आर माधवन यांचा 'शैतान' येणार ओटीटीवर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि आर माधवन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला 'शैतान' हा चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा ही काळी जादू, वशीकरण यावर आधारित असल्याचे पाहायला मिळते. पण या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरलेला हा चित्रपट आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘शैतान’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अजय देवगण आणि आर माधवनची जोडी पाहायला मिळाली. आजपर्यंत नायक म्हणून लोकप्रिय ठरलेल्या आर माधवनने या चित्रपटात चक्क खलनायकाची भूमिका वठवून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. लवकरच हा चित्रपट घरबसल्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. म्हणजेच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. जाणून घेऊयात ‘शैतान’ ओटीटीवर कधी व कुठे पाहता येणार?
वाचा: सलूनच्या बाहेर स्वत:चा फोटो पाहून संतोष जुवेकरने केली मेजशीर पोस्ट, म्हणाला 'अपून तो हिरो बनगया!'

कोणत्या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?

'शैतान' हा चित्रपट ३ मार्च रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट खरं तर अंधविश्वास, काळी जादू, वशीकरण यासर्व गोष्टींवर आधारित असल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटात अजय देवगण एका पित्याची भूमिका साकारत आहे. तर आर माधवन वनराज नावाच्या खलनायकाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात ज्योतिका सदाना-सर्वणन, जानकी बोडीवाला, अंगद राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
वाचा: बायकोचं सामान उचलून कुशल बद्रिके निघाला फिरायला, मजेशीर फोटो शेअर करत म्हणाला...

या चित्रपटाचा आहे रिमेक

बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट हे जवळपास इतर भाषांमधील चित्रपटांचा रिमेक असतो. 'शैतान' हा चित्रपट देखील गुजरातीमध्ये प्रदर्शित झालेल्या 'वश' या चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जानकी बोडीवालाने जान्हवी हे पात्र साकारले होते. हिंदी रिमेकमध्ये देखील तिच महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.
वाचा: लंडनमध्ये राधिका मर्चंट- अनंत अंबानीसाठी पाकिस्तानी गायक अतिफ असलमने गायले गाणे, फोटो व्हायरल

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचा धुमाकूळ

‘शैतान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने जिवळपास १४९ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील अजय देवगणने केले आहे. आता घरबसल्या हा चित्रपट पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

IPL_Entry_Point