मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Javed Akhtar : जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Javed Akhtar : जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 04, 2024 09:25 AM IST

Javed Akhtar : जावेद अख्तर यांना पद्मपाणी पुरस्कार मिळताच त्यांनी भविष्यवाणी केली आहे. ' यावेळी भारतीय सिनेमाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील,' असे जावेद अख्तर म्हणाले.

Indian screenwriter, lyricist and poet Javed Akhtar (Photo by Sujit JAISWAL / AFP)
Indian screenwriter, lyricist and poet Javed Akhtar (Photo by Sujit JAISWAL / AFP) (AFP)

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी जावेद अख्तर यांनी भविष्यवाणी केली. 'भारतीय सिनेमाचे भविष्य सामान्य नागरिक ठरवतील' असे जावेद अख्तर म्हणाले.

जावेद अख्तर यांना पद्मपाणी पुरस्कार मिळताच त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा यांच्यासह आणखी काही बोटांवर मोजण्याइतके दिग्दर्शक ज्यांनी संवेदनशीलता जपत समाजाला संदेश देणारे चित्रपट बनवले आहेत. या प्रकारचे चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांसमवेत प्रेक्षक किती काळ आणि कधीपर्यंत सोबत असतील यावर भारतीय सिनेमाचे भविष्य ठरेल.'
वाचा: सयाजी शिंदेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट, काय झाली दोघात चर्चा?

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कायमच चर्चेत असतो. जगभरातील चित्रपट हे मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचावे यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा अजिंठा वेरुळ अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे नववे वर्ष होते. एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मीणी सभागृहात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी, गीतकार जावेद अख्तर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मंचावर एनएफडीसीच्या वरीष्ठ अधिकारी गौरी नायर, फिल्मसिटी मुंबईचे उपव्यवस्थापकीय संचालक संजय कृष्णाजी पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, महोत्सव संचालक अशोक राणे, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी व सर्व संबंधित उपस्थित होते.

WhatsApp channel

विभाग