Viral News: काय म्हणताय! सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा झाला होता ‘सिक्रेट निकाह’? काय म्हणाली अभिनेत्री?-aishwarya rai reachted on secret nikah wedding rumors with salman khan know the truth of viral news ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral News: काय म्हणताय! सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा झाला होता ‘सिक्रेट निकाह’? काय म्हणाली अभिनेत्री?

Viral News: काय म्हणताय! सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा झाला होता ‘सिक्रेट निकाह’? काय म्हणाली अभिनेत्री?

Aug 17, 2024 11:07 AM IST

Aishwarya Rai and Salman Khan: ज्यावेळी सलमान आणि ऐश्वर्या डेटिंग करत होते, त्यावेळी इंडस्ट्रीत दोघांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा रंगली होती.

Aishwarya Rai and Salman Khan
Aishwarya Rai and Salman Khan

Aishwarya On Secret Wedding Rumors With Salman: एकेकाळी बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची खूप चर्चा होत होती. सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाले असले, तरी हे जोडपे त्यावेळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. नंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले आणि ती संसारात रमली. दोघांना आराध्या बच्चन ही एक मुलगी आहे. तर, सलमान खान मात्र अजूनही सिंगल लाइफ एन्जॉय करत आहे. मात्र, एकदा सलमान आणि ऐश्वर्याच्या ‘सिक्रेट निकाह’च्या अफवा पसरल्या होत्या. त्यावर स्वतः अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली होती.

ज्यावेळी सलमान आणि ऐश्वर्या डेटिंग करत होते, त्यावेळी इंडस्ट्रीत दोघांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा रंगली होती. दोन्ही बाजूंनी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसताना देखील दोघांचा निकाह समारंभ झाल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले गेले होते. लोणावळ्यातील एका बंगल्यात झालेल्या या निकाह सोहळ्यात मुंबईतील एका काझी यांनी सहभाग घेतल्याचे बोलले जात होते. या लग्नासाठी ऐश्वर्याने इस्लाम धर्म स्वीकारल्याची अफवा पसरली होती. तर या निकाहला त्यांच्या जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती, अशीही चर्चा होती.

निकाह झाला आणि हनिमूनही?

मात्र, सलमान आणि ऐश्वर्याचे आई-वडील या लग्नाला उपस्थित नव्हते, असेही या रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले होते. नंतर, अशा अफवा देखील पसरल्या की लग्नानंतर हे जोडपे त्यांच्या हनिमूनसाठी न्यूयॉर्कला गेले होते आणि मुंबईला परतल्यावर ते एकत्र दिसले होते. मात्र, हे नाकारता येत नाही की, ऐश्वर्याचे आई-वडील नेहमीच त्यांच्या मुलीच्या सलमान खानशी लग्न करण्याच्या विरोधात होते आणि अफवांमुळे त्यांचा त्रास भरपूर वाढला होता. याशिवाय ऐश्वर्या राय स्टारर चित्रपटांच्या निर्मात्यांना तिच्या लग्नाची बातमी समोर येताच, त्यांच्या चित्रपटांच्या भविष्याची चिंता वाटू लागली होती.

अखेर ऐश्वर्याने दिली प्रतिक्रिया!

जेव्हा ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या ‘सिक्रेट निकाह’च्या अफवा वाऱ्यासारख्या पसरत होत्या, तेव्हा अभिनेत्रीने शांतपणे या सर्व चर्चा धुडकावून लावल्या होत्या. मीडियाशी बोलताना ऐश्वर्या म्हणाली होती की, ‘जर हे घडले असते तर, संपूर्ण इंडस्ट्रीला याची खबर मिळाली नसती का? इंडस्ट्री ही फार छोटी आहे. शिवाय माझ्या आईच्या अपघातानंतर, मला माझ्या कुटुंबासोबत घालवायलाही वेळ मिळाला नाही. मग लग्न करायला वेळ कुठून मिळेल? मी अशा लोकांसारखी नाही, जे गुपचूप लग्न करतील.’

ऐश्वर्या रायने घेतला मोठा निर्णय! बच्चन कुटुंबच नाही तर देशही सोडणार; लेकीला घेऊन परदेशी स्थायिक होणार?

सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या ब्रेकअपचे कारण काय?

सलमान आणि ऐश्वर्याच्या लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या चाहत्यांना दोघांचे ब्रेकअप झाल्यावर धक्काच बसला होता. एका वृत्तपत्राला दिलेल्या जुन्या मुलाखतीत ऐश्वर्याने त्यांच्या नात्यातील समस्यांबद्दल सांगितले होते. यावेळी तिने सलमानसोबत राहताना तिला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले, ते देखील सांगितले होते. यात तिने म्हटले की, ‘मी माझ्या सर्वात वाईट काळात सलमानच्या मद्यपी गैरवर्तनाचा सामना केला. इतकंच नाही तर शाब्दिक, शारीरिक आणि भावनिक अत्याचार, बेवफाई आणि अपमान सहन केला. त्यामुळे मी त्याच्यासोबतचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता.’