घटस्फोटाची चर्चा सुरू असताना ऐश्वर्यानं सासरेबुवांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा खास पोस्ट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  घटस्फोटाची चर्चा सुरू असताना ऐश्वर्यानं सासरेबुवांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा खास पोस्ट

घटस्फोटाची चर्चा सुरू असताना ऐश्वर्यानं सासरेबुवांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा खास पोस्ट

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 12, 2024 12:13 PM IST

Amitabh Bachchan Birthday: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ११ ऑक्टोबर रोजी ८२वा वाढदिवस साजरा करण्यात आला. अमिताभ यांची सून अभिनेत्री ऐश्वर्य राय बच्चनने एक जुना फोटो शेअर करत बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Amitabh Bachchan and Aishwarya
Amitabh Bachchan and Aishwarya

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा ११ ऑक्टोबर रोजी वाढदिवस असतो. यंदा त्यांनी कुटुंबीयांसोबत त्यांचा ८२वा वाढदिवस आनंदाने साजरा केला. गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबीयांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच अमिताभ बच्चन यांचा लेक अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय यांचा घटस्फोट झाल्याचेही बोलले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, ऐश्वर्याने सोशल मिडिया पोस्टद्वारे अमिताभ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय आहे ऐश्वर्याची पोस्ट?

ऐश्वर्या राय ही सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते. पण यावेळी तिने थेट सोशल मीडियाद्वारे सासरेबुवांना पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्याने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलगी आराध्या आणि सासरे अमिताभ यांचा जुना फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्याने हा फोटो शेअर करत, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पा-दादाजी. देव तुम्हाला सदैव आनंदी ठेवो' असे कॅप्शन दिले आहे.

अभिषेक आणि श्वेताने बिग बींसाठी पोस्ट केली नाही

आश्चर्याची बाब म्हणजे अमिताभ यांच्या ८२व्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. मात्र, बिग बींचा मुलगा, अभिनेता अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांनी सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. अमिताभ बच्चन अनेकदा इन्स्टाग्राम आणि एक्सवर पोस्ट शेअर करून आपला मुलगा अभिषेक बच्चनचे कौतुक करतात. मात्र, ते आपली सून ऐश्वर्या राय यांच्याबद्दल कधीच काही लिहीत नाहीत. असे असूनही यावेळी ऐश्वर्याने बिग बींसाठी पोस्ट केली आहे. मात्र, अभिषेकने कोणतीही पोस्ट केलेली नाही.
वाचा: भर मांडवात राणी मुखर्जीवर चिडली काजोल, फटका मारतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल

बच्चन कुटुंबाच्या कामाविषयी

ऐश्वर्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती मणिरत्नम दिग्दर्शित 'पोन्नयिन सेल्वन २' या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता ती पुन्हा कोणत्या चित्रपटात दिसणार याविषयी माहिती समोर आलेली नाही. पण चाहते ऐश्वर्याला पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी आतुर आहेत. अभिषेक लवकरच अॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या 'बी हॅपी' या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन हे नुकताच प्रदर्शित झालेला 'वेट्टायन' हा चित्रपट चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रजनीकांत आहेत. सॅनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने दोन दिवसांत ५५.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Whats_app_banner