१२ जुलै रोजी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा लग्नसोहळा पार पडला. अनंतने राधिका मर्चंटशी लग्न केले. त्याच्या लग्नाच्या प्रीवेडींग सोहळ्यांपासून ते रिसेप्शनपर्यंत जवळपास सर्वाची चर्चा रंगली आहे. दरम्यान, आता या सोहळ्यातील अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पादूकोणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या दीपिकाला मिठी मारते. तेवढ्यात ऐश्वर्याचे डोळे पाणावल्याचे दिसत आहे. असे काय झाले की ऐश्वर्याला रडू कोसळले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि दीपिकाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या गरोदर दीपिकाला मिठी मारताना दिसत आहे. त्यानंतर ऐश्वर्या दीपिकाच्या कानात काही तरी बोलते. ते बोलताना ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. नेमकं ऐश्वर्या काय बोलली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या दोघांमधील खास नात्याची झलक या व्हिडीओद्वारे नेटकऱ्यांना पहायला मिळाली. यावेळी दीपिका आणि ऐश्वर्याच्या मागेच अभिनेता हृतिक रोशन उभा आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात तिने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. तर येत्या सप्टेंबर महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे.
ऐश्वर्या आणि दीपिका ऐकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असल्याचे पाहायला मिळते. २०१८मध्ये त्या दोघींचा एक खास व्हिडीओ व्हायरल झाला होता. दोघीही ईशा अंबानीच्या प्री-वेडींगमध्ये मजा मस्ती करताना दिसत होत्या. प्री-वेडिंगमध्ये ऐश्वर्या दीपिकाचा हात खेचून तिला बाजूला नाचायला बोलावते. त्यानंतर दोघी एकमेकींसोबत मनसोक्त नाचतात. नंतर दीपिका ही आराध्यासोबतही डान्स करते.
यापूर्वी अनंत आणि राधिकाच्या लग्नातील एक व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओमध्ये संपूर्ण बच्चन कुटुंबीय एकत्र लग्नाला आले होते. त्यामध्ये जया बच्चन, अमिताभ बच्चन, नव्या नवेली नंदा, श्वेता बच्चन, अभिषेक बच्चन सगळे एकत्र दिसत आहेत. पण आराध्या आणि ऐश्वर्या कुठेही दिसल्या नाहीत. ऐश्वर्या ही रेखासोबत येताना दिसली.
वाचा: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील हा कलाकार पुन्हा दिसणार मालिकेत? नाव ऐकून चाहते झाले आनंदी
अनंत अंबानीच्या लग्नाला जवळपास संपूर्ण बॉलिवूड हजर होते. शाहरुख खान, रजनीकांत, अनिल कपूर, सलमान खान, रणवीर सिंह, दीपिका पादूकोण, ऐश्वर्या राय, आलिया भट्ट, रणबीर कपूर, सारा अली खान आणि इतक कलाकार दिसले होते.