गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. घटस्फोटाच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर या दोघांचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये दोघे मॅचिंग कपडे घालून पार्टीला हजर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. तसेच हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
उद्योजक अनु रंजन आणि अभिनेत्री आयशा झुल्का यांनी आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. अनुने शेअर केलेल्या फोटोमध्ये ऐश्वर्या तिची आई वृंद्या रायसमोर उभी राहून सेल्फी काढताना दिसत आहे. अनुने वृंद्याचा हात धरला तर अभिषेक त्यांच्या मागे उभा राहिला. सर्वांनी हसत हसत कॅमेऱ्याला पोज दिली. या इव्हेंटसाठी ऐश्वर्या आणि अभिषेक ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले होते. ऐश्वर्याने काळ्या रंगाचा लाँग ड्रेस घातला आहे तर अभिषेकने काळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे.
सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि अभिषेकचे हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. या फोटोवर एका यूजरने, "खूप प्रेम" असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, "हे आवडले, अनु... तुम्ही खरंच सगळ्यांची मानसिकता बदलून टाकलीत" अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने, 'सर्व खोट्या अफवा आता बंद करा' असे एका यूजरने म्हटले आहे. "मजबूत स्त्रिया समस्या टाळण्यासाठी केवळ घटस्फोट घेत नाहीत तर त्यावर उपाय शोधतात" असे म्हणत ऐश्वर्याचे कौतुक केले आहे.
आयेशा झुल्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर या इव्हेंटचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्याने सेल्फी क्लिक केले होते. आयशा, अभिषेक आणि ऐश्वर्याने ही कॅमेऱ्याला पोज दिली. या कार्यक्रमासाठी आयशाने लाल रंगाची साडी नेसली होती. या पार्टीत तुषार कपूर आणि सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होते. पार्टीचे ठिकाण आणि इतर तपशील अद्याप समजू शकलेला नाही.
जुलै 2024 मध्ये अनंत अंबानीयांच्या लग्नादरम्यान ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबातील मतभेदाच्या अफवा सुरू झाल्या होत्या. जेव्हा ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या बच्चन कार्यक्रमस्थळी स्वतंत्रपणे पोहोचल्या तेव्हा याची सुरुवात झाली. अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, मुलगी श्वेता, नातू अगस्त्य नंदा आणि नात नव्या नवेली यांच्यासह बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांनी एकत्र हजेरी लावली होती. अभिषेक किंवा त्याच्या कुटुंबीयांनी ऐश्वर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्यानंतर या अफवांना वेग आला. ऐश्वर्या आणि अभिषेकने २००७मध्ये लग्न केले. त्यांना आराध्या बच्चन नावाची मुलगी आहे, तिचा जन्म १६ नोव्हेंबर २०११ रोजी झाला.
संबंधित बातम्या