बॉलिवूडमध्ये प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेशोत्सवाची देखील एक वेगळी चमक पाहायला मिळत आहेत. बॉलिवूडपासून ते छोट्या पडद्यावरील कलाकार हे मोठ्या श्रद्धेने गणेश चतुर्थी उत्साहाने साजरी करताना दिसत आहे. अनेकांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. तर काही जण गणपतीचा आशिर्वाद घेण्यासाठी अनेक मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी मंडपात पोहोचले आहेत. दरम्यान, ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो मुलगी आणि आईसोबत दिसत आहे. तिचा पती अभिनेता अभिषेक कुठेही दिसत नाही.
नुकतेच गणेश चतुर्थीला बॉलिवूडचे सर्व स्टार्स मुकेश अंबानी यांच्या घरी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन आणि आई वृंदा राय बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अभिषेक हा ऐश्वर्यासोबत दिसला नाही. व्हिडीओमध्ये यावेळी ऐश्वर्याला एकटे पाहून चाहते खूप निराश झाले होते. ऐश्वर्या आणि अभिषेकचे नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणपतीचे आशीर्वाद घेण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चनही एक ठिकाणी पोहोचली होती. ती मुलगी आराध्या आणि आई वृंदा राय यांच्यासह गणपतीच्या दर्शनासाठी जीएसबी सेवा मंडळ येथे पोहोचली होती. यावेळी अभिषेक बच्चन ऐश्वर्यासोबत दिसला नाही. या दरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. ऐश्वर्याला पुन्हा एकटं पाहून चाहत्यांना खूप वाईट वाटलं. ऐश्वर्याला पाहून लोकांनी व्हिडीओ आणि फोटो काढण्यास सुरुवात केली. गर्दी जमली. ऐश्वर्या कशीबशी गर्दीतून बाहेर पडली आणि तिथून आई आणि मुलीला घेऊन गाडीतून निघून गेली.
ऐश्वर्या रायच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर यावेळी तिने लाइट पिंक कलर आणि मजेंटा कलर कॉम्बिनेशनचा सूट परिधान केला होता. नेहमीप्रमाणे या ड्रेसमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहे. तर तिची मुलगी आराध्या पिवळ्या रंगाचा सूट परिधान करताना दिसली. गर्दीत ऐश्वर्या आईची काळजी घेताना दिसत आहे. तसेच ती मुलीची देखील तितकीच काळजी घेताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: बिग बॉस मराठीने बदलले शिव ठाकरेचे आयुष्य! किती रुपये मिळाले बक्षीस?
अलीकडेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त होण्याच्या बातमीला जोरदार हवा मिळाली होती. या घटस्फोटाच्या बातम्यांना तेव्हा अधिक रंगत आली, जेव्हा ते दोघे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात स्वतंत्रपणे पोहोचले होते. ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या या लग्नाला एकत्र उपस्थित होत्या. तर, अभिषेक बच्चन मात्र त्याच्या आई, वडील आणि बहिणीसोबत लग्नात पोहोचला होता. अशातच सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्यांच्या नात्याविषयीच्या गोष्टी समोर येऊ लागल्या होत्या.