बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एकीकडे तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अफवांना उधाण येत आहे. तर, दुसरीकडे एकामागून एक मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असल्यामुळे ती चर्चेत आहे. याआधी काही कार्यक्रमांदरम्यान तिच्या हातातून लग्नाची अंगठी गायब झालेली दिसली होती, तेव्हा लोकांचे लक्ष तिच्या बोटावर केंद्रित झाले होते. यानंतर आता पॅरिस फॅशन वीकमधील ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये अभिनेत्रीची वागणूक पाहून आता तिचे चाहते अभिनेत्रीचं तोंडभरून कौतुक करत आहेत.
एकीकडे ऐश्वर्या मीडियामध्ये चर्चेत असतानाच आता ती ‘आयफा अवॉर्ड्स २०२४’मध्येही सहभागी झाली होती. आता या अवॉर्ड शोमध्ये तिची एन्ट्री झाल्यानंतर काय झाले याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऐश्वर्याला समोर पाहताच एक महिला चाहती हमसून हमसून रडू लागली. आता तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र, तिला असं रडताना पाहून ऐश्वर्याने जे केलं, त्यामुळे आता तिचं तोंड भरून कौतुक होत आहे. अभिनेत्रीला पाहून ही महिला अशी हमसून हमसून रडली, कारण ती ऐश्वर्याची खूप मोठी फॅन आहे.
आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये लाल वेस्टर्न गाऊन परिधान करून उभी असलेली एक महिला रडताना दिसत आहे आणि ऐश्वर्या राय तिला अतिशय प्रेमाने शांत करत असल्याचे दिसत आहे. अभिनेत्री आपल्या चाहतीला शांत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते. यावेळी चाहती जेव्हा भावनिकपणे तिला सांगते की, तुम्हाला भेटण्याचे माझे स्वप्न आज पूर्ण झाले आहे, तेव्हा ऐश्वर्या तिचं बोलणं मनापासून ऐकते. इतकंच नाही तर, ऐश्वर्या राय-बच्चन अँकर असलेल्या या महिलेला अतिशय प्रेमानं मिठी देखील मारते.
आता ऐश्वर्या राय हिने आपल्या फिमेल फॅनला ज्या पद्धतीने प्रेमाने हाताळले आणि तिच्याशी आपुलकीने वागली, हे पाहून चाहतेही ऐश्वर्याच्या प्रेमात पडले आहेत. ऐश्वर्या तिच्या नम्र स्वभावासाठी ओळखली जाते. ती चाहत्यांना ज्या पद्धतीने भेटते, त्यामुळे ती इतर अभिनेत्रींपेक्षा नेहमीच वेगळी ठरते. आजही तिची हीच वागणूक तिच्या चाहत्यांना आवडते. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते पुन्हा पुन्हा बच्चन कुटुंबाच्या सुनेचे कौतुक करताना दिसत आहेत.
संबंधित बातम्या