गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन चर्चेत आहेत. या दोघांच्या नात्यात दुरावा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या दोघांपैकी एकानेही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमिताभ बच्चन हे देखील सोशल मीडियाद्वारे अनेक विषयांवर बोलताना दिसतात. पण त्यांनी लेकाच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, ऐश्वर्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तिच्यासोबत दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एका व्यक्ती सोबतचा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. हा फोटो अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टच्या सेटवरील आहे. ऐश्वर्यासोबत दिसणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून तिचा मेकअप आर्टिस्ट आहे. मेकअप आर्टिस्टने रविवारी ऐश्वर्यासोबतचे काही फोटो शेअर केले असून ते पाहून चाहतेही खूप खूश झाले आहेत. पण अभिनेत्री या सेटवर कोणत्याही चित्रपटासाठी नाही तर एका जाहिरातीसाठी शूटिंग करत आहे.
ऐश्वर्या रायच्या व्हायरल झालेल्या या फोटोवर अभिनेत्रीचे चाहते खूप सकारात्मक संदेश देत आहेत. कुणी तरी लिहितंय की राणी परत आलीय... ऐश्वर्या राय पुन्हा कामावर रुजू झाली आहे. कोणीतरी लिहिलं आहे की, तुम्ही दोघं भाऊ-बहिणीसारखे दिसता.
वाचा: पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्या 'चिमणी पाखरं'मधील अंजू आठवतेय का? वाचा सध्या काय करते
बुधवारी दुबईत ग्लोबल वुमन्स फोरमचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ऐश्वर्याला पाहुणी म्हणून बोलावण्यात आले होते. त्यावेळी तिने भाषण दिले. या भाषणात ऐश्वर्याने ती चित्रपटांव्यतिरिक्त काय करते हे सांगितले आहे. समाजात बदल घडवून आणण्यासाठी, समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जगभरातील महिलांसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी आम्ही एकाच विषयावर आवाज उठवण्यासाठी एकत्र आले आहे असे ऐश्वर्या म्हणाली.
ऐश्वर्या नुकतीच दुबईतील एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. या इवेंटमधील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. कार्यक्रमातील ऐश्वर्याच्या लूकने सर्वांना घायाळ केले होते. तसेच या कार्यक्रमात जेव्हा ती स्टेजवर पोहोचली तेव्हा तिच्या मागे स्क्रीनवर तिचं नाव आलं, जे पाहून चाहते थक्क झाले. तिच्या नावापुढे म्हणजेच ऐश्वर्या रायच्या पुढे 'बच्चन' आडनाव मिस होतं. तेवढ्यात नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या नात्यातील दुरावा यावर भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी वेगवेगळे अनुमान लावण्यास सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या