मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  नेहमी तर आईसोबत दिसते, मग शाळेत कधी जाते?; आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्याचे उत्तर

नेहमी तर आईसोबत दिसते, मग शाळेत कधी जाते?; आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्याचे उत्तर

Aarti Vilas Borade HT Marathi
May 21, 2024 02:26 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही नेहमीच मुलगी आराध्याला सोबत घेऊन फिरताना दिसते. त्यामुळे अनेकदा तिला ट्रोल केले आहे. या ट्रोलिंगवर ऐश्वर्याने सडेतोड उत्तर दिले आहे.

आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्याने दिले उत्तर
आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्याने दिले उत्तर

विश्व सुंदरी म्हणून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ओळखली जाते. तिने सध्या इंडस्ट्रीपासून लांब असली तरी मोठ्या चित्रपट महोत्सवांना हजेरी लावताना दिसते. तिच्यासोबत तिची १२ वर्षांची मुलगी आराध्या देखील नेहमीच दिसते. आजकाल फोटोग्राफर्सदेखील आराध्याचे फोटो काढण्यासाठी मागेपुढे करत असतात. पण ऐश्वर्यासोबत नेहमीच आराध्या दिसत असल्यामुळे नेटकऱ्यांनी ती शाळेत जाते की नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. पण ऐश्वर्याने एका मुलाखतीमध्ये यावर उत्तर दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ऐश्वर्या ही कायम मुलीला घेऊन फिरत असते. मग एखादा पुरस्कार सोहळा असू देत वा विदेशी दौरा ऐश्वर्या आराध्याला घेऊन जाताना दिसते. अनेकदा नेटकऱ्यांनी आराध्या शाळेत जाते की नाही असा प्रश्न विचारला. आता ऐश्वर्याने या प्रश्नाचे उत्तर एका मुलाखतीमध्ये दिले आहे. तिने आराध्याच्या शाळेच्या प्लानिंगविषयी माहिती दिली आहे.
वाचा: कार्तिकला बारशाचे आमंत्रण देऊन इंद्राने केला घोळ, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत पहिल्यांदाच मुक्ताने सुनावले सावनीला

काय म्हणाली ऐश्वर्या?

आराध्याच्या शाळेचा एकही खाडा न होता बाहेर जाण्याचा प्लान करत असते. कधी कुठे कसे जायचे? कोणती फ्लाइट आहे? याचे नियोजन करायला मी शिकले आहे. मी सगळे प्लानिंग एकदम व्यवस्थित करते असे ऐश्वर्या म्हणाली.
वाचा: आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

पुढे ती म्हणाली की, 'तुम्ही अनेकदा पाहिले असेल की आम्ही आराध्याच्या शाळेला जेव्हा सुट्टी असते तेव्हाच फिरायला जाण्याचा विचार करतो. तिच्या शाळेनुसारच आमचे नियोजन असते. अनेकदा फिरुन आल्यावरही आराध्याच्या शाळेचा खाडा होणार नाही याचा आम्ही जास्त विचार करत असतो. सोमवारी आम्ही आराध्याची शाळा कधीही बुडवत नाही. आमचे संपूर्ण लक्ष तिच्या आभ्यासाकडे, शाळेकडे असते.'
वाचा: मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

आराध्या कोणत्या शाळेत शिकते?

आराध्या ही अभिषेक आणि ऐश्वर्या बच्चनची मुलगी आहे. ती धीरुभाई इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. अनेक स्टार किड्सची मुले याच शाळेत शिक्षण घेताना दिसतात. आराध्याचे ज्या शाळेत शिक्षण झाले तेथेच अनन्या पांडे, सुहाना खान, करीना कपूरची मुले आणि बॉलिवूडमधील इतर स्टारकिड्स शिक्षण घेत असल्याचे अनेकदा बोलले जाते. या शाळेची फी देखील इतर शाळांचा तुलनेत जास्त असल्याचे बोलले जाते.

टी-२० वर्ल्डकप २०२४