मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi
May 17, 2024 08:37 AM IST

'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मधील अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा लूक समोर आला आहे. हात मोडलेला असताना देखील ऐश्वर्याचा जलवा जराही कमी झालेला नाही.

 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये ऐश्वर्या राय बच्च
'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये ऐश्वर्या राय बच्च

'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४'ला नुकताच सुरुवात झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये अनेक अभिनेत्री हजेरी लावताना दिसत आहेत. अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नुकताच या फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता त्या पाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन देखील या फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली आहे. ऐश्वर्याचा हात मोडलला असताना देखील ती या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे ऐश्वर्याचा लूक?

'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४'मध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी ऐश्वर्या पोहोचली आहे. हात फ्रॅक्चर असतानाही ऐश्वर्याचा उत्साह जराही कमी झालेला दिसत नाही. तिने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. त्यावर गोल्डन रंगाचे काही वर्क करण्यात आले आहे. मोकळे केस, साजेसे कानातले, न्यूड मेकअपमध्ये ऐश्वर्या अतिशय सुंदर आहे. फाल्गुनी शेन पीकॉकने ऐश्वर्याचा आऊटफिट डिझाईन केला होता. ऐश्वर्या गेल्या कित्येक वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लॉरिअल पॅरिस या ब्यूटी ब्रँडचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहे.
वाचा: 'हे नाटक नाही, राखीची प्रकृती अतिशय गंभीर आहे', अत्यंत जवळच्या व्यक्तीने दिली माहिती

ऐश्वर्याच्या लूकवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव

ऐश्वर्या राय बच्चनच्या या लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ऐश्वर्याने नक्की काय परिधान केले आहे, मला वाटते रेड कार्पेट लूकसाठी हिला एका चांगल्या डिझायनरची गरज आहे, ड्रेसवरची डिझाइन अतिशय वाईट आहे, ऐश्वर्याचा नेहमीपेक्षा चांगला लूक, म्हणून आज ती विश्वसुंदरी आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
वाचा: गौरव मोरेच्या 'मॅड' अदांवर बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत फिदा! पाहा रोमँटिक व्हिडीओ

आता पर्यंत पोहोचलेले कलाकार

'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४'मध्ये आतापर्यंत 'शार्क टँक' या कार्यक्रमामधील नमिता थापर, अभिनेत्री उर्वशी रौतेला, दिप्ती साधवानी यांनी आपला जलवा दाखवला आहे. तसेच आरजे करिश्मासारखे नवोदित चेहरेदेखील यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जलवा दाखवताना दिसून येतील. मराठमोळी अभिनेत्री छाया कदमदेखील 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'साठी रवाना झाली आहे. 'चलो कान्स' म्हणत चाहत्यांना तिने आनंदाची बातमी दिली. ऐश्वर्या राय बच्चन देखील लेक आराध्यासह कान्स फिल्म फेस्टिव्हलला हात फ्रॅक्चर असताना देखील पोहोचली असल्याचे दिसत आहे. तिचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
वाचा: बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या 'श्रीकांत'ची जेमतेम कमाई, सहाव्या दिवशी फक्त इतकी कमाई

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग