मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  घटस्फोट दूरच... एकमेकांच्या रंगात रंगले ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन! फोटो पाहून चाहते सुखावले

घटस्फोट दूरच... एकमेकांच्या रंगात रंगले ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन! फोटो पाहून चाहते सुखावले

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 26, 2024 09:11 AM IST

ऐश्वर्या, अभिषेक आणि त्यांची लेक तिघेही आपल्या मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी बाहेर गेले होते. नुकतेच त्यांच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

घटस्फोट दूरच... एकमेकांच्या रंगात रंगले ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन! फोटो पाहून चाहते सुखावले
घटस्फोट दूरच... एकमेकांच्या रंगात रंगले ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन! फोटो पाहून चाहते सुखावले

होळी आणि धुळवडीचा सण मोठ्या जल्लोषात पार पडला आहे. धुळवडीच्या निमित्ताने कलाकारांनी देखील चांगलाच कल्ला केला. आता काही बॉलिवूड कलाकारांचे रंगांची उधळण करतानाचे फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. या दरम्यान बच्चन कुटुंबानेही मोठ्या थाटामाटात होळी साजरी केली आहे. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर होळी सेलिब्रेशनचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये, नव्या तिचे आजोबा अमिताभ बच्चन, आजी जया बच्चन आणि आई श्वेता बच्चन नंदा यांच्यासोबत होळी साजरी करताना दिसत आहे. मात्र, या फोटोंमध्ये ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन आणि अभिषेक बच्चन कुठेच दिसले नव्हते. यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, आता त्यांच्या अनुपस्थितीचे कारण समोर आले असून, चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

नव्या नवेली नंदा जेव्हा बच्चन कुटुंबासोबत फोटो काढत होती, तेव्हा ऐश्वर्या, अभिषेक आणि त्यांची लेक तिघेही आपल्या मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी बाहेर गेले होते. नुकतेच त्यांच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये तिघेही धमाल करताना दिसले आहेत.

शिव ठाकरेही झालाय कास्टिंग काउचचा शिकार; आपबिती सांगताना म्हणाला 'कपड्यांचे माप घेण्याच्या बहाण्याने...'

ऐश्वर्या-अभिषेकने कोणासोबत साजरी केली होळी?

मानसोपचारतज्ज्ञ झिरक मार्कर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ऐश्वर्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्यासोबत आराध्या आणि अभिषेक बच्चनही दिसत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे हे फोटो पाहून लोक खूश झाले आहेत. त्यांना ऐश्वर्याचा हा नवा लूक खूप आवडला आहे. तर, दुसरीकडे ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र होळी साजरी करताना आणि एकमेकांच्या रंगात बुडताना दिसल्याने चाहते देखील सुखावले आहेत. दोघांमध्ये सगळं काही सुरळीत असून, घटस्फोट केवळ अफवा असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.

मनोरंजन विश्वाचा लाडका ‘व्हिलन’; अभिनेते प्रकाश राज यांच्याबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी ऐकल्यात का?

चाहत्यांसाठी पर्वणी!

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असूनही ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते. फक्त सार्वजनिक कार्यक्रमांमध्येच चाहत्यांना ऐश्वर्याची झलक पाहायला मिळते. मात्र, इव्हेंट्समध्येही अभिनेत्री अनेकदा पारंपरिक लूकमध्येच पाहायला मिळते. तर, आता होळीच्या निमित्ताने ऐश्वर्याला लेगिंग्ज, टी-शर्ट आणि श्रगमध्ये पाहणे चाहत्यांसाठी पर्वणीच होती. ऐश्वर्याचा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. इतकंच नाही तर, सध्या चाहते आराध्याच्या हेअरस्टाइलचंही कौतुक करत आहे.

IPL_Entry_Point