मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन यांनी साजरा केला लग्नाचा वाढदिवस! शेअर केला क्युट फोटो

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन यांनी साजरा केला लग्नाचा वाढदिवस! शेअर केला क्युट फोटो

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 21, 2024 09:03 AM IST

एकीकडे घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू असताना, ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे.

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन यांनी साजरा केला लग्नाचा वाढदिवस! शेअर केला क्युट फोटो
घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन यांनी साजरा केला लग्नाचा वाढदिवस! शेअर केला क्युट फोटो

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या कामासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. ऐश्वर्या आणि अभिषेक हे चाहत्यांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. दोघांना एकत्र पाहणे चाहत्यांना नेहमीच आवडते. मात्र, काही महिन्यांपासून त्यांच्या लग्नाबाबत विविध प्रकारच्या बातम्या समोर आल्या होत्या. परंतु, आता सर्व बाजूंनी येणाऱ्या या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. एकीकडे घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू असताना, ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. २० एप्रिल २००७ रोजी दोघांचे लग्न झाले होते. दोघांनी आपल्या लग्नाचा १७वा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, ऐश्वर्या आणि अभिषेकने आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकच फोटो शेअर केला आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक व्यतिरिक्त, या फोटोमध्ये त्यांची लेक आराध्या बच्चन देखील दिसत आहे. या क्युट फॅमिली फोटोमध्ये आराध्या बच्चन हिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आराध्याचा तिच्या आई-वडिलांसोबतचा हा फोटो खूपच गोंडस आहे. या पोस्टवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

अभिषेक-ऐश्वर्याने शेअर केला क्युट फोटो

आपल्या कुटुंबाचा हा क्युट फोटो शेअर करताना ऐश्वर्या आणि अभिषेकने कॅप्शनमध्ये फक्त एक रेड हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. त्यांच्या या फोटोसाठी केवळ एक रेड हार्ट इमोजी ही पुरेसा आहे. ऐश्वर्या अनेकदा तिच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. विशेषतः मुलगी आराध्यासोबत ऐश्वर्याचे सर्वाधिक फोटो पाहायला मिळतात. बॉलिवूड स्टार्सपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनी या कपलच्या पोस्टवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर अनेक युजर्स आराध्याच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

असा केला होता प्रपोज

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले, तर दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. एका चित्रपटादरम्यानच दोघांची आधी मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. न्यूयॉर्कच्या एका हॉटेलच्या बाल्कनीत उभे राहून अभिषेकने ऐश्वर्याकडे आपले प्रेम व्यक्त केले होते, असा त्यांचा प्रपोज किस्सा खूपच प्रसिद्ध आहे. त्याचवेळी त्याने अभिनेत्रीला लग्नासाठीही प्रपोज केले होते. यानंतर अतिशय थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता.

IPL_Entry_Point