Aishwarya-Aaradhya Bachchan Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अनेकदा तिची मुलगी आराध्यासोबत दिसत असते. ऐश्वर्या कुठेही गेली की, ती नेहमी आराध्याला सोबत घेऊनच जाते. ऐश्वर्या तिची मुलगी आराध्याशिवाय कुठेही जात नाही. असे क्वचितच घडले असेल, जेव्हा ऐश्वर्या आराध्याला सोबत न घेता कुठे गेली असेल. यावेळी ऐश्वर्या पुन्हा तिच्या मुलीसोबत दिसली आहे. दुबई विमानतळावरील आई आणि मुलगी दोघींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर युजर्सनी प्रश्नांचा वर्षाव सुरू केला आहे.
नुकताच ऐश्वर्या आणि आराध्याचा एक व्हिडीओ इंटरनेटवर समोर आला असून, तो दुबई विमानतळावरील असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये नेहमी प्रमाणेच ऐश्वर्या आपल्या सौंदर्याने लोकांची मने जिंकताना दिसली आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्यासोबत तिची मुलगी आराध्याही दिसत आहे आणि ती खूप आनंदीही दिसत आहे. सोशल मीडियावर लोक ऐश्वर्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत असताना, आराध्याला फक्त एकच गोष्ट विचारत आहेत.
आराध्या नेहमीच आपल्या आईसोबत फिरताना दिसत असते. आता या व्हिडीओवर कमेंट करत युजर्सनी एकच प्रश्न विचारला आहे की, आराध्या शाळेत जात नाही का? एका युजरने या व्हिडीओवर कमेंट केली की, आराध्याची शाळा यामुळे बुडत नाही का? दुसऱ्या युजरने लिहिले, ती शाळेत जात नाही का? तिसऱ्या यूजरने लिहिले की, आराध्या शाळा चुकवत असते का? आणखी एका युजरने लिहिले की, शाळाही असेल किंवा एखाद्याला नेहमीच सुट्टी मिळते. या व्हिडिओवर बहुतांश लोकांच्या याच कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
विशेष म्हणजे आराध्या नेहमीच ऐश्वर्यासोबत बाहेर जाताना दिसते. अभिनेत्री कुठेही गेली तरी, तिच्या मुलीला सोबत घेऊन जाते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला त्यांचा हा व्हिडीओ दुबईचा आहे. ऐश्वर्या राय-बच्चन सिमा अवॉर्ड्ससाठी दुबईला गेली आहे. ऐश्वर्या आणि आराध्या ही मायलेकींची जोडी नेहमी एकत्र खूप सुंदर दिसते.
उल्लेखनीय आहे की, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक वेगळे झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, प्रत्येक वेळी या बातम्या खोट्या असल्याचे सिद्ध होत आहे. ऐश्वर्या कथितरित्या अभिषेकपासून वेगळी राहत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे, परंतु सत्य काय आहे हे कोणालाही माहिती नाही. त्याचबरोबर या जोडप्याचे चाहते त्यांनी नेहमी एकत्र राहावे आणि आनंदी राहावे अशी प्रार्थना करत आहेत.