Aishwarya-Abhishek News: घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच अभिषेक-ऐशच्या चाहत्यांना मिळणार गुडन्यूज! काय असणार नवा धमाका?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aishwarya-Abhishek News: घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच अभिषेक-ऐशच्या चाहत्यांना मिळणार गुडन्यूज! काय असणार नवा धमाका?

Aishwarya-Abhishek News: घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच अभिषेक-ऐशच्या चाहत्यांना मिळणार गुडन्यूज! काय असणार नवा धमाका?

Nov 07, 2024 01:00 PM IST

Aishwarya Rai-Abhishek Bachchan News:अभिषेक-ऐश्वर्या यांच्या चाहत्यांना एक मोठी गुडन्यूज मिळणार आहे. दोघेही ऑनस्क्रीन एक नवीन अध्याय सुरू करणार असल्याची चर्चा होत आहे.

Aishwarya Rai Bachchan
Aishwarya Rai Bachchan

Aishwarya Rai-Abhishek Bachchan News : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात मतभेद असल्याच्या आणि त्यांचा घटस्फोट होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दोन्ही कलाकार लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या प्रकरणी दाम्पत्य आणि कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या दरम्यान आता दोघांच्या चाहत्यांना एक मोठी गुडन्यूज मिळणार आहे. आता अशी बातमी समोर येत आहे की, दोघेही ऑनस्क्रीन एक नवीन अध्याय सुरू करणार आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम या जोडीला पुन्हा एका चित्रपटासाठी कास्ट करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. ही जोडी त्यांच्या ‘गुरु’ या चित्रपटात एकत्र दिसली होती. आता पुन्हा एकदा दोघे मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याच्या या बातमीने चाहते खूप खूश झाले आहेत. या वृत्तामुळे आता अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात काहीही तक्रार नसल्याचे म्हटले जात आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी त्यांच्या घटस्फोटाबद्दल किंवा त्यांच्यातील वादाबद्दल कधीच चर्चा केली नाही. दोघांनीही यावर चुप्पी साधली आहे. या आधीही अनेकदा दोघांच्या घटस्फोटाची बातमी चर्चेत आली होती. 

Aishwarya Rai divorce : खरंच अभिषेक-ऐश्वर्याचा घटस्फोट झाला? अमिताभ बच्चन यांच्या बर्थडे व्हिडीओमुळे चर्चांना उधाण!

गुरूमध्ये पहिल्यांदाच एकत्र दिसले ऐश-अभिषेक!

मणिरत्नमच्या 'गुरू'ने ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना २००७मध्ये एकत्र आणले होते. या चित्रपटानंतरच अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे लग्न झाले होते. त्यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. यानंतर मणिरत्नमने त्यांना पुन्हा ‘रावण’मध्ये कास्ट केले होते. आता मीडिया रिपोर्टनुसार, त्यांना तिसऱ्यांदा एकत्र आणण्यासाठी चित्रपट निर्माते मनिरत्नम यांना एक दमदार कथा सापडली आहे.

अभिषेकने केलं कौतुक

जर, खरंच हा चित्रपट होणार असेल, तर मणिरत्नमसोबत अभिषेक बच्चनचा हा चौथा चित्रपट असणार आहे. यापूर्वी त्यांनी ‘युवा’मध्येही एकत्र काम केले होते. मणिरत्नमसोबतच्या नात्याबद्दल बोलताना अभिषेक बच्चन एका मुलाखतीत म्हणाला होता की, ‘जेव्हा ते पहिल्यांदा माझ्या घरी युवासाठी साइन करण्यासाठी आले होते, तेव्हा मला वाटले की, ते माझ्या वडिलांना म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासाठी आले आहेत. जेव्हा मला कळले की, त्यांना मलाच साईन करायचे होते, तेव्हा मला आनंद झाला. त्यांच्यासोबत काम करायला कोणताही अभिनेता तयार असतो. मला खूप अभिमान आहे की, त्यांनी मला आतापर्यंत तीन वेळा त्यांच्या सिनेमासाठी संधी दिली आहे.’

Whats_app_banner