मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनचा धमाकेदार डान्स! इंटरनेटवर व्हिडीओचा धुमाकूळ

Viral Video: अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनचा धमाकेदार डान्स! इंटरनेटवर व्हिडीओचा धुमाकूळ

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 02, 2024 12:25 PM IST

Aishwarya-Abhishek Dance In Ambani Wedding Viral Video: बॉलिवूडची सध्या चर्चेत असलेली जोडी म्हणजेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन धमाकेदार डान्स करताना दिसले आहेत.

Aishwarya-Abhishek Dance In Ambani Wedding Viral Video
Aishwarya-Abhishek Dance In Ambani Wedding Viral Video

Aishwarya-Abhishek Dance In Ambani Wedding Viral Video: सध्या सगळीकडेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. अंबानी कुटुंबं म्हटलं की आलिशान पार्टी ही झालीच पाहिजे. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंगची ही पार्टी एवढी भव्य आणि आलिशान होती की, देशातच नाही तर जगभरात तिची चर्चा झाली. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग पार्टीचा पहिला दिवस नुकताच पार पडला आहे. या सोहळ्यात अनेक हॉलिवूड स्टार्सनी सादरीकरण केले. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी कॉकटेल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये स्टार्सनीही आपली जादू दाखवली. दरम्यान, आता अंबानी कुटुंबाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बॉलिवूडची सध्या चर्चेत असलेली जोडी म्हणजेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन धमाकेदार डान्स करताना दिसले आहेत.

सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. मात्र, या चर्चेदरम्यान देखील ऐश्वर्या आणि अभिषेक अनेकदा एकत्र स्पॉट होतात आणि या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देतात. मात्र, आता त्यांचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन धमाकेदार डान्स करताना दिसले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Dunki Break Record: शाहरुख खानने मोडला स्वतःचाच रेकॉर्ड! नेटफ्लिक्सवर ‘डंकी’ने रचला नवा विक्रम

अनेकांच्या भुवया उंचावल्या!

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये बी-टाऊनची चर्चित जोडी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन डान्स करताना दिसत आहे. अंबानींच्या प्री-वेडिंग पार्टीत 'गल्लां गुडियां' या गाण्यावर ही जोडी नाचताना दिसली आहे. घटस्फोटाची चर्चा सुरू असताना ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, त्यांचा हा अनंत अंबानींच्या लग्नातला नसून, २०१८मध्ये पार पडलेल्या ईशा अंबानीच्या लग्न सोहळ्यातला आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकने ईशा अंबानीच्या प्री-वेडिंग पार्टीत भरपूर डान्स केला होता.

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांनीही केला डान्स!

ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूरही नाचताना दिसत आहेत. ईशा अंबानीने १२ डिसेंबर २०१८ रोजी आनंद पिरामलसोबत लग्न केले होते. आता हा जुना व्हिडीओ अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीदरम्यान व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर, या सोहळ्यातील आणखी काही व्हिडीओही इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय ही दीपिका पदुकोणसोबत डान्स करताना दिसली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा गुजरातच्या जामनगरमध्ये पार पडला आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी देश-विदेशातील पाहुणे आले आहेत.

IPL_Entry_Point