अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने नुकताच तिची आई वृंदा राय यांचा वाढदिवस साजरा केला आणि पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. शुक्रवारी ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर या सेलिब्रेशनची एक झलक दाखवली, ज्यात तिची मुलगी आराध्या बच्चन आणि त्यांचे नातेवाईकदेखील उपस्थित होते. यातील एका पोस्टमध्ये ऐश्वर्याने आराध्या, वृंदा आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत पोज दिली होती. त्यांच्यासमोर ऐश्वर्याच्या वडिलांचा फोटो असलेले टेबल ठेवण्यात आले होते. त्यावर केक आणि पुष्पगुच्छही ठेवण्यात आला होता. वृंदा खुर्चीवर बसल्या होत्या, तर ऐश्वर्या जमिनीवर आणि आराध्या आजीच्या मागे उभी राहिली.
यावेळी ऐश्वर्या आणि आराध्या दोघीही काळ्या रंगाच्या पोशाखात दिसल्या. आणखी एका फोटोत अभिनेत्रीचा जखमी हातही दिसत होता. पुढच्या फोटोत वृंदाने ऐश्वर्याला मिठी मारली तर आराध्याने त्यांच्याभोवती हात गुंडाळला आहे. हे फोटो शेअर करताना ऐश्वर्याने लिहिले की, ‘लव्ह यू बर्थडे गर्ल, प्रिय मम्मी-डोडा.’
आणखी एका पोस्टमध्ये ऐश्वर्याने तिच्या आईचा गोल्डन सूटमधील फोटो शेअर केला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना तिने लिहिले की, 'हॅप्पी बर्थ डे डिअर डार्लिंग मम्मी-दोड्डा. तुझ्यावर कायम प्रेम करेन." या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले की, अभिषेक बच्चन कुठे आहे? 'अभिषेक सेलिब्रेशनचा भाग का नाही?' असं एका कमेंटमध्ये लिहिलं आहे. अनेकांनी वृंदा यांना शुभेच्छा देत ऐश्वर्याचे कौतुक ही केले. एका चाहत्याने म्हटलं, "हॅप्पी बर्थडे काकू!! अशी सुंदर व्यक्ती तुम्ही या जगात आणली आहे! तुम्हीही एक महान व्यक्ती असाल!" तर या सगळ्यात अभिषेक कुठेच दिसत नसल्याने आता सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ऐश्वर्या नुकतीच ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भाग घेऊन भारतात परतली आहे. आराध्यासोबत ऐश्वर्या मुंबई विमानतळावर दिसली होती. त्यांच्या गाडीकडे जाताना ऐश्वर्याने पापराझींना हात दाखवला. ऐश्वर्याच्या कान्स प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे आकर्षक रेड कार्पेट लूक. ब्लॅक अँड गोल्ड स्ट्रॅपलेस गाऊनपासून ते निळ्या आणि सिल्व्हर आऊटफीटपर्यंत ऐश्वर्या सगळ्यातच सुंदर दिसत होती. या संपूर्ण कार्यक्रमात ऐश्वर्या हाताच्या दुखापतीमुळे प्लास्टर दिसली.
२००२ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये देवदासच्या प्रीमिअरसाठी शाहरुख खान आणि संजय लीला भन्साळी यांच्यासोबत तिने पदार्पण केले होते. गेल्या काही वर्षांत ऐश्वर्याने केवळ रेड कार्पेटवरच हजेरी लावली नाही, तर ज्युरी मेंबर म्हणूनही काम केले आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ७७ व्या पर्वाचा समारोप २५ मे रोजी होणार आहे. ऐश्वर्या शेवटची 'पोन्नयिन सेलवन २' या चित्रपटात दिसली होती.
संबंधित बातम्या