Aishwarya Abhishek Divorce Rumors:बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. मात्र, दोघांनी अजूनही यावर मौन बाळगले आहे. आता ऐश्वर्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री कधी वडिलांच्या फोटोजवळ,कधी आईसोबत, तर कधी मुलगी आराध्यासोबत पोज देताना दिसत आहे. यासोबतच व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने आराध्यासाठी एक खास संदेश लिहिला आहे.
या फोटोंमध्ये ऐश्वर्या रायने बच्चन फॅमिलीसोबत नाही, तर आई आणि मुलीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अभिनेत्री तिचे वडील कृष्णराज रॉय यांच्या फोटोजवळ उभी आहे,तर दुसऱ्या फोटोमध्ये आराध्या आणि ऐश्वर्या वृंदा रॉयसोबत आहेत. तर यावेळी तिने आराध्याच्या बालपणीचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्या हसताना दिसली आहे.
ऐश्वर्या रायने १६ नोव्हेंबरला तिची मुलगी आराध्या बच्चनचा १३वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या चार दिवसांनंतर,ऐश्वर्याने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त तिच्या मुलीचे न पाहिलेले नऊ फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आराध्याच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतची झलक पाहायला मिळाली आहे. फोटोंसोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्या आयुष्यातील अमर प्रेम,माझे प्रिय बाबा-अज्जा आणि माझ्या लाडक्या आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.'ऐश्वर्या राय हिने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये एक फोटो असा आहे, ज्यामध्ये ‘आता तू अधिकृतपणे टीनएजर झालीस’, असे लिहिले आहे. यासोबतच फोटो शेअर करताना तिने पोस्ट लिहिली की,'वाढदिवसाच्या शुभेच्छा, माय सोल’.
ऐश्वर्याने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी तिची आणि आराध्याची प्रशंसा करायला सुरुवात केली. त्याच वेळी,इतर काही लोक तिला तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांबद्दल प्रश्न विचारत आहेत. एका व्यक्तीने कमेंटमध्ये घटस्फोटाबद्दलही लिहिले होते.
ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलगी आता १३ वर्षांची झाली आहे. यावेळी अभिनेत्रीचा तिच्या मुलीसोबतचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आई आणि मुलगी दोघीही मॅचिंग कपड्यांमध्ये हातात अनेक पुष्पगुच्छ घेऊन दिसल्या होत्या. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान,अभिनेत्याचे नाव निम्रत कौरशी जोडले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘दसवी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान निम्रत आणि अभिषेक एकमेकांच्या जवळ आले होते.