बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खान ३ जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकली. तिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी लग्नगाठ बांधली. मुंबईतील ताज लँडमध्ये अतिशय साध्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या सगळीकडे आयरा खान आणि नुपूर शिखरेची चर्चा सुरु आहे. खास करुन अनेकांना नुपूरविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
आयरा ही आमिर खान आणि रीना दत्ता यांची मुलगी आहे. तिला जुनैद खान नावाचा मोठा भाऊ देखील आहे. जुनैद हा ३० वर्षांचा आहे तर आयरी ही २६ वर्षांची आहे. आयराने वयाने तिच्यापेक्षा मोठ्या फिटनेस ट्रेनरशी लग्नगाठ बांधली आहे. नुपूर हा आयरापेक्षा जवळपास १२ वर्षांनी मोठा आहे. तो आता ३८ वर्षांचा आहे.
वाचा: आमिरने भरमांडवात किरण रावला केले किस, अशी होती पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया
आमिर खानचा जावई नुपूर शिखरेचा जन्म १७ ऑक्टोबर १९८५ साली पुण्यात झाला आहे. तर, तो लहानाचा मोठा मुंबईत झाला आहे. त्याने मुंबईतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने मुंबईतील महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. तर, आयरा खानने तिचे शालेय शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. यानंतर तिने नेदरलँडमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. नुपूर शिखरे हा इंडस्ट्रीमध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून सक्रिय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नुपूर शिखरे बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा वैयक्तिक ट्रेनर म्हणून काम करत होता. याशिवाय नुपूर फिटनेस एक्स्पर्ट आणि कन्सल्टेट आहे.
नूपुर आणि आयरा दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. दोघेही एकत्र खूप क्युट दिसतात. आयरा आणि नुपूर यांनी गतवर्षी १८ नोव्हेंबरला साखरपुडा केला होता. आता दोघे लग्न बंधनात अडकले आहेत. नुपूर आणि आयराच्या लग्नाला आमिरचे संपूर्ण कुटुंबीय हजर होते. आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता, किरण राव आणि दोघींचीही मुले उपस्थित होती.