Urvashi Rautela: आधी बाथरूम व्हिडीओ लीक; आता उर्वशी रौतेलाची ऑडिओ क्लीप व्हायरल! नक्की झालंय काय?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urvashi Rautela: आधी बाथरूम व्हिडीओ लीक; आता उर्वशी रौतेलाची ऑडिओ क्लीप व्हायरल! नक्की झालंय काय?

Urvashi Rautela: आधी बाथरूम व्हिडीओ लीक; आता उर्वशी रौतेलाची ऑडिओ क्लीप व्हायरल! नक्की झालंय काय?

Published Jul 18, 2024 04:36 PM IST

Urvashi Rautela Leaked Video: उर्वशी रौतेलाची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यात ती खूप संतापलेली दिसत आहे आणि या लीक व्हिडीओबद्दल आपल्या मॅनेजरशी बोलताना दिसली आहे.

आधी बाथरूम व्हिडीओ लीक; आता उर्वशी रौतेलाची ऑडिओ क्लीप व्हायरल! नक्की झालंय काय?
आधी बाथरूम व्हिडीओ लीक; आता उर्वशी रौतेलाची ऑडिओ क्लीप व्हायरल! नक्की झालंय काय?

Urvashi Rautela Leaked Video: बॉलिवूडची ‘ब्युटी क्वीन’ अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, जो पाहिल्यानंतर चाहते देखील अवाक् झाले होते. तिचा हा व्हायरल व्हिडीओ थेट बाथरूममधून इंटरनेटवर लीक झाला आहे. या व्हिडीओमध्ये उर्वशी रौतेला बाथरूममध्ये दिसत आहे आणि तिला माहितच नव्हते की, तिचा खाजगी व्हिडीओ रेकॉर्ड होत आहे. यानंतर ती कॅमेरासमोरच तिचे कपडे काढते. उर्वशी बाथरूममध्ये येते, टॉवेल लटकवते आणि मग आरशात स्वत:ला पाहते आणि केस सरळ करते, असे देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर उर्वशी रौतेला अंघोळीसाठी कपडे काढू लागते. या धक्कादायक व्हिडीओनंतर आता तिची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.

सुरुवातीला लोकांना वाटत होते की, उर्वशीची ही व्हिडीओ क्लिप तिच्या एखाद्या चित्रपटातील दृश्य असेल. परंतु, आता हे प्रकरण काहीतरी वेगळे असल्याचे दिसते आहे. आता हे प्रकरण आणखी गंभीर बनत चालले आहे. या व्हिडीओनंतर आता अभिनेत्रीचा ऑडिओही लीक झाला आहे. उर्वशी रौतेलाचा एक ऑडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री तिच्या मॅनेजरशी बोलताना दिसत आहे.

Richa Chadha-Ali Fazal: मुलगी झाली हो! ‘हिरामंडी’ फेम रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल झाले आई-बाबा

अभिनेत्री मॅनेजरवर चिडली!

उर्वशी रौतेलाची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यात ती खूप संतापलेली दिसत आहे आणि या लीक व्हिडीओबद्दल आपल्या मॅनेजरशी बोलताना दिसली आहे. अभिनेत्री फोनवर तिच्या मॅनेजरला विचारत आहे, 'तुम्ही तो व्हिडिओ पाहिला का? या गोष्टी कशा बाहेर येत आहेत, हे मला समजत नाही. मला त्याच्याशी ताबडतोब बोलण्याची गरज आहे.’ यावेळी अभिनेत्रीचा मॅनेजर तिला म्हणतो की, तो सोशल मीडियावरून हा व्हिडीओ हटवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर तो अभिनेत्रीला समजावताना दिसत आहे.

उर्वशीचा व्हिडीओ डिलीट करण्याचे प्रयत्न सुरू!

या ऑडिओ क्लीपमध्ये उर्वशीचा मॅनेजर तिला असेही सांगत आहे की, ‘याविषयी फोनवर बोलू नकोस, तू इथे पोहोचल्यावर समोरासमोर बोलूया... कारण फोनवर याबाबत बोलणे योग्य होणार नाही.’ मात्र, आता त्यांचा हा वैयक्तिक ऑडिओही व्हायरल झाला आहे. हे ऐकल्यानंतर लोक आता याला अभिनेत्रीचा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणू लागले आहेत. लीक झालेला व्हिडीओ देखील तिच्या एखाद्या प्रोजेक्टचा एक भाग असल्याचं सगळे म्हणत आहेत. याचे कारण म्हणजे या व्हिडीओमध्ये उर्वशीने मंगळसूत्र घातले आहे आणि तिचे कपडेही अगदी साधे दिसत आहेत. त्यामुळे हा तिच्या चित्रपटातील लीक झालेला सीन असू शकतो, अस म्हटले जात आहे. याशिवाय हा ऑडिओ देखील खरा आहे की, नाही याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

Whats_app_banner