घटस्फोटानंतर अमृताने मुलांना सैफला भेटण्यासाठी घातली होती बंदी, होता मोठा संशय
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांच्या लग्नानंतर काही वर्ष सगळं काही सुरळीत होतं. परंतु नंतर अचानक संबंध बिघडले आणि परिणामी दोघांचा घटस्फोट झाला.
प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची जोडी 1990 च्या दशकात फार चर्चेत असायची. 1991 मध्ये सैफ आणि अमृता यांनी लग्न केलं होतं. परंतु जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा सैफ अमृतापेक्षा 12 वर्षांनी लहान होता. त्याने तोपर्यंत बॉलिवूडमध्ये पदार्पणही केलेलं नव्हतं. तर अमृता त्या काळी सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती.
ट्रेंडिंग न्यूज
अमृता यांनी सैफसोबत लग्न त्यांच्या कुटुंबियांच्या मर्जीवरोधात जाऊन केलं होतं असं म्हटलं जातं. लग्नानंतर त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम खान असे दोन अपत्य झाली. परंतु त्यानंतर दोघांमधील संबंध बिघडायला सुरुवात झाली.
2004 मध्ये त्यांच्या लग्नाला 13 वर्ष पूर्ण होत असताना दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सारा आणि इब्राहिम हे अमृताकडेच रहायचे. त्यानंतर सैफ हा इटालियन मॉडेल रोजासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळं अमृता यांनी सारा आणि इब्राहिम यांना त्यांच्या वडिलांना म्हणजे सैफला भेटायला बंदी घातली होती.
त्यांना भीती होती की सैफची गर्लफ्रेंड रोजा ही मुलांना त्यांच्याविरोधात भडकवू शकते. कारण सैफसोबत त्यांचे संबंध आधीच बिघडलेले होते. त्यामुळं अमृता यांनी मुलांना सैफसोबत अबोला धरायला लावला होता.
दरम्यान अमृता यांना घटस्फोट दिल्यानंतर आणि रोजासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अखेरीस सैफने बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरसोबत 2012 साली मोठ्या थाटामाटात लग्न केलं. त्यांना आता दोन मुलंदेखील आहेत.