shahrukh khan news : सलमान नंतर शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी, कोणी केला मुंबई पोलिसांना फोन?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  shahrukh khan news : सलमान नंतर शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी, कोणी केला मुंबई पोलिसांना फोन?

shahrukh khan news : सलमान नंतर शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी, कोणी केला मुंबई पोलिसांना फोन?

Nov 07, 2024 03:39 PM IST

Shah Rukh Khan Death Threat : वांद्रे पोलिसांना लँडलाईन नंबरवर अज्ञात फोन आला, ज्यात फोन करणाऱ्याने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

bollywood actor shah rukh khan
bollywood actor shah rukh khan

Shah Rukh Khan Death Threat : गेल्या काही दिवसांपासून सलमान खानसह काही बॉलिवूड कलाकारांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना हा धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. हा फोन नक्की कुणी केला होता, हे अद्याप समजू शकलेले नाही. अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या एका तरुणाला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक केली होती.

वांद्रे पोलिस ठाण्यात फोन आल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा फोन सर्व्हेलन्सवर ठेवला असता, तो छत्तीसगडमधील रायपूरयेथून आल्याचे निष्पन्न झाले आहे. या तपासासाठी पोलिसांचे एक पथक तातडीने छत्तीसगडला रवाना झाले आहे. हा फोन वांद्रे पोलिसांना आला, त्यानंतर पोलिसांकडून शाहरुख खानच्या स्टाफला सतर्क करण्यात आले.

पोलिसांकडून तपास सुरू

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांचे पाठक आता फैजान खान नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. फैजानच्या फोनचा वापर धमकी देण्यासाठी करण्यात आला होता. या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, धमकी देणाऱ्या व्यक्तीने कोट्यवधी रुपयांची खंडणीची मागणी केली आहे. तसेच हे पैसे न दिल्यास शाहरुख खानला इजा पोहोचवण्याची धमकी या अज्ञात व्यक्तीने दिली आहे.

Veer Zaara : एक-दोन नव्हे, तब्बल ६०० स्क्रीन्सवर २० वर्षांनंतर पुन्हा रिलीज होणार शाहरुख- प्रितीचा ‘वीर जारा’!

शाहरुखला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये धमकीही मिळाली होती. याआधीही त्याला त्याच्या कारकिर्दीत अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही ‘पठान’ आणि ‘जवान’ या चित्रपटांच्या यशानंतर त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या संदर्भात अभिनेत्याने महाराष्ट्र पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती, त्यानंतर त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.

सलमान खानही हिटलिस्टवर

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या राजस्थानमधील एका व्यक्तीला बुधवारी कर्नाटकात अटक करून महाराष्ट्र पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. भिखा राम (वय ३२, रा. जालोर, राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे. हावेरीचे पोलीस अधीक्षक अंशु कुमार यांनी पीटीआयला सांगितले की, ‘महाराष्ट्र एटीएसकडून (दहशतवादविरोधी पथक)  मिळालेल्या माहितीच्या आधारे हावेरी शहरातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आणि आज त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.’ सलमान खान हा बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर आहे. त्याला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. 

Whats_app_banner