Video: रतन टाटा यांच्या निधनाची बातमी कळताच गायकाने लाइव्ह कॉन्सर्ट थांबवला अन्…
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Video: रतन टाटा यांच्या निधनाची बातमी कळताच गायकाने लाइव्ह कॉन्सर्ट थांबवला अन्…

Video: रतन टाटा यांच्या निधनाची बातमी कळताच गायकाने लाइव्ह कॉन्सर्ट थांबवला अन्…

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Oct 10, 2024 08:23 PM IST

Video: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंजाबी गायक दिलजीत दोसांजने लाइव्ह कॉन्सर्ट थांबवला.

रतन टाटा, दिलजीत दोसांझ
रतन टाटा, दिलजीत दोसांझ

भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसली. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर एका भारतीय गायकाने परदेशात सुरु असलेला लाइव्ह कॉन्सर्ट थांबवला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. या गायकाच्या कॉन्सर्टमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील गायक दुसरा तिसरा कोणी नसून दिलजीत दोसांज आहे. दिलजीत जर्मनीत परफॉर्म करत होता. लाइव्ह परफॉर्म करत असताना दिलजीतला रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त काळाले. त्याने लगेच लाइव्ह कॉन्सर्ट थांबवला. त्याने रतन टाटा यांच्याविषयी चार ओळी बोलून श्रद्धांजली वाहिली. दिलजीतने जर्मनीतील जनतेला सांगितले की, आजपर्यंत त्याला रतन टाटांना भेटण्याची संधी मिळाली नाही, पण त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला दिलजीत म्हणतो, "रतन टाटा यांच्याबद्दल तुम्हा सर्वांना माहिती असेलच. त्यांचे निधन झाले आहे. ही माझी त्यांना छोटीशी श्रद्धांजली आहे. आज मला त्याचं नाव घेणं गरजेचं वाटतं, कारण त्याने ज्या पद्धतीने त्यांनी काम केले आहे ते कायम सर्वांच्या लक्षात राहिल. मी त्यांच्याबद्दल जे काही ऐकल किंवा वाचलं आहे, त्यावरुन मी कधीच कोणाला त्यांच्या बद्दल वाईट बोलताना पाहिलेलं नाही."

पुढे दिलजीत म्हणाला, "त्यांनी आयुष्यात नेहमीच मेहनत घेतली, चांगले काम केले, इतरांना मदत केली. माणसं अशीच असायला हवीत. त्याच्या जीवनातून आपण एक गोष्ट शिकू शकलो तर ती म्हणजे आपण कठोर परिश्रम केले पाहिजेत, सकारात्मक विचार केला पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे आणि जीवन पूर्णपणे जगले पाहिजे."
Manvat Murders Review: परभणीतील सत्य घटनेवरील थरारक कथा, वाचा 'मानवत मर्डर'चा रिव्ह्यू

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत झाला होता. त्यांच्या आईचे नाव सुनू टाटा होते आणि ते नौशेरवानजींचे पुत्र होते. रतन टाटा १० वर्षांचे असताना त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. रतन टाटा हे असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांच्यावर सगळ्यांनीच भरभरून प्रेम केले.

Whats_app_banner