बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. रिलीजच्या २ महिन्यांनंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून राहिला होता. या चित्रपटाने जगभरात बक्कळ कमाई केली. आता या चित्रपटाच्या यशानंतर शाहरुखने नवी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
पठाणच्या यशानंतर शाहरुखने रॉल्स रॉयल कुलिनन ही गाडी खरेदी केली आहे. ही गाडी नुकताच शाहरुखचा बंगला मन्नतच्या आत जाताना दिसली. सध्या सोशल मीडियावर शाहरुखच्या या गाडीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ही रॉल्स रॉयल पांढऱ्या रंगाची आहे. या गाडीचा '555' असा नंबर आहे. या गाडीची किंमत आठ कोटी २० लाख रुपये आहे.
वाचा: नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदेंनी घेतली चंद्रपूर पोलीसांच्या भेटीला, काय आहे कारण?
शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट २५ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. ‘पठाण’ हा चित्रपट आजही लाखोंची कमाई करत आहे. रिलीजच्या ५० दिवसांनंतरही जगभरात ‘पठाण’चा प्रभाव कायम आहे. पठाण अजूनही यूके, यूएस, ऑस्ट्रेलिया, यूएई आणि कॅनडा यांसारख्या देशांमध्ये हाउसफुल कमाई करत आहे. ‘पठाण’ चित्रपटाने भारतात ६५० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. तर, परदेशात १००० कोटींहून अधिकचा आकडा पार केला आहे.
संबंधित बातम्या