'मदर इंडिया' फेम अभिनेते साजिद खान यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही काळापासून साजिद खान कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र, उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. २२ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले आहे. मात्र, त्यांच्या निधनाची माहिती ही आता समोर आली आहे. सोशल मीडियावर अनेकजण साजिद खान यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहे. दरम्यान, दिग्दर्शक साजिद खानने व्हिडीओ शेअर करच मी जीवंत आहे असे म्हटले आहे.
'मदर इंडिया' या चित्रपटातील अभिनेते साजिद खान आणि 'हाऊसफूल' या चित्रपटाचे दिग्दर्शक साजिद खान यांच्या नावात साम्य असल्यामुळे अनेक चाहत्यांचा गोंधळ झाला. दिग्दर्शक साजिद खानला अनेक मेसेज जात असल्यामुळे त्याने वैतागून सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत 'मी जीवंत आहे' असे म्हटले आहे.
वाचा: विक्रम गोखलेंचा शेवटचा चित्रपट 'सूर लागू दे'चा ट्रेलर प्रदर्शित
साजिदने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, '१९५७ साली मंदर इंडिया हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच ज्या छोट्या मुलाने सुनिल दत्त यांची भूमिका साकारली होती त्याचे नाव साजिद खान आहे. त्यांचा जन्म १९५७मध्ये झाला होता. त्यानंतर २० वर्षांनी माझा जन्म झाला. त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो' साजिद खान असे म्हणाला.
पुढे तो म्हणाला, 'काही लोकांनी शहानिशा न करताच माझा फोटो लावला आणि श्रद्धांजली वाहिली. मला काल रात्रीपासून फोन, मेसेज येत आहेत. पण तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाने मी जिवंत आगे. मला अजून तुमचे मनोरंजन करायचे आहे.' सध्या सोशल मीडियावर साजिदचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
साजिद खान यांना 'माया' मधील त्यांच्या व्यक्तिरेखेमुळे खूप प्रसिद्धी मिळाली होती. यात त्यांनी 'राज जी'ची भूमिका केली होती. त्यांचे हे पात्र खूप गाजले होते. चित्रपटाला मिळालेली लोकप्रियता पाहून पुढे याच नावाची मालिकाही बनवण्यात आली आणि त्यामुळे साजिद खान यांची कीर्ती आणखी वाढली. अमेरिकन टीव्ही शो 'द बिग व्हॅली'च्या एका एपिसोडमध्ये ते पाहुणे म्हणूनही दिसले होते. तर, 'इट्स हॅपनिंग' या म्युझिक शोमध्ये ते पाहुणे जज म्हणून झळकले होते.
संबंधित बातम्या