‘मे आय कम इन मॅडम’नंतर इच्छा नसतानाही काम करावं लागलं! अभिनेत्री नेहा पेंडसे असं का म्हणाली?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘मे आय कम इन मॅडम’नंतर इच्छा नसतानाही काम करावं लागलं! अभिनेत्री नेहा पेंडसे असं का म्हणाली?

‘मे आय कम इन मॅडम’नंतर इच्छा नसतानाही काम करावं लागलं! अभिनेत्री नेहा पेंडसे असं का म्हणाली?

Published Nov 28, 2024 02:49 PM IST

Neha Pendse Career : नेहा पेंडसे हिने इंडस्ट्रीत खूप लहान वयात पदार्पण केलं आणि तिच्या अभिनयाने चांगली ओळख मिळवली. तिने अनेक टीव्ही शोजमध्ये काम केले आहे.

Neha Pendse
Neha Pendse

Neha Pendse Struggle for Work :  आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने मराठीच नव्हे, तर हिंदी मनोरंजन विश्व देखील गाजवले आहे. नेहा पेंडसे आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारताना दिसली आहे, आणि तिच्या कामाचा प्रभाव आजही प्रेक्षकांवर आहे. मात्र, तिने आपल्या करिअरमधला खडतर टप्पा कसा होता, यावर आता भाष्य केलं आहे.

नेहा पेंडसे हिने इंडस्ट्रीत खूप लहान वयात पदार्पण केलं आणि तिच्या अभिनयाने चांगली ओळख मिळवली. तिने अनेक टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. ‘मे आय कम इन मॅडम’ या शोमध्ये तिच्या अभिनयाची खूप चर्चा झाली होती. या शोमुळे तिला एक मोठा ब्रेक मिळाला, पण त्यानंतर एका मुलाखतीत तिने खुलासा केला की, 'मे आय कम इन मॅडम'नंतर तिच्या करिअरमध्ये एक असा टप्पा आला, जिथे ती आपल्या कामावर समाधानी नव्हती. नेहा म्हणाली, "मी जे काही करत होते त्यात मला आनंद मिळत नव्हता. ‘मे आय कम इन मॅडम’ नंतर हा टप्पा माझ्या आयुष्यात आला आणि मला कामामध्ये कुठेही आनंद दिसत नव्हता. माझी काम करायची इच्छा नव्हती.'

‘बिग बॉस’मुळे हिंमत मिळाली! 

नेहा पेंडसेने एका मुलाखतीत सांगितलं की, ‘अभिनेत्री म्हणून आपण खूप असुरक्षित असतो. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आपल्याला नेहमीच स्वतःची काळजी घ्यावी लागते. बिग बॉसच्या आधी मला अनेक गोष्टींना हो म्हणायला भाग पडावं लागायचं, ज्या गोष्टी मला करायच्या नव्हत्या त्यासाठी होकार द्यावा लागायचा. पण, बिग बॉस नंतर मला नकार देण्याचे धैर्य मिळाले.’ या अनुभवांमुळे नेहा पेंडसेच्या करिअरमध्ये बदल झाला आणि तिने २०१९ मध्ये कोणतेही काम मनाला पटल्या शिवाय न करण्याचा निर्णय घेतला.

मलायका दुसऱ्याच्या हातात हात घालून फिरताना दिसली; अर्जुनच्या काळजाचं पाणी झालं! पोस्ट लिहित म्हणाला...

 नेहा पेंडसेची कारकीर्द 

नेहा पेंडसेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर तिने विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ‘कॅप्टन हाऊस’, ‘पडोसन’, ‘हसरते’, ‘मीठी मीठी बातें’, ‘रिश्ते’, ‘घर एक मंदिर’, ‘खुशी’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘मधुबाला-एक इश्क एक जुनून’, ‘मे आय कम इन मॅडम?’, ‘बिग बॉस १२’, ‘खतरा खतरा’ असे अनेक शोज तिने केले आहेत. त्याचबरोबर ‘प्यार कोई खेल नहीं’, ‘दिवाने’, ‘तुम से अच्छा कौन है’, ‘देवदास’, ‘गोलमाल’, ‘नथिंग बट लाइफ’, ‘ड्रीम’, ‘इंस्पेक्टर झांसी’, ‘दिल तो बच्चा है जी’, ‘सूरज पे मंगल भारी’, ‘जून’ यांसारख्या चित्रपटांमध्येही तिचं योगदान आहे.

नेहा पेंडसेच्या करिअरला कलाटणी देण्याचा क्षण  २०१९मध्ये एका मराठी चित्रपटामुळे आला. या चित्रपटाने तिच्या अभिनयाला एक नवा आयाम दिला. नेहा पेंडसे या वर्षी तिच्या वाढदिवसाला खास आनंदी आहे, कारण तिच्या करिअरमधील अनेक अडचणींवर मात करत तिने आत्मविश्वास आणि कामातील सुख मिळवले आहे. अभिनेत्री उद्या म्हणजेच २९ नोव्हेंबरला तिचा वाढदिवस साजरा करत आहे. 

Whats_app_banner